जि.प.च्या "दंगली'त डाव्यांचेही दोन हात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीच्या दंगलीत औरंगाबादसह संपुर्ण मराठवाड्यात प्रमुख राजकीय पक्षांशी दोन हात करण्याची तयारी डाव्यांनी सुरु केली आहे. शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून सर्व 62 गटात उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. सोबत भारिपला घेण्यासाठी डाव्यांनी बोलणी सुरु केली असून सरकार विरोधातील रोष मतांच्या रुपाने कॅश करुन घेण्याचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. 

संभाजी ब्रिगेडच्या माध्यामतून राज्यात दांडगा जनसंपर्क आणि समर्थन असलेल्या प्रवीण गायकवाड यांनी नुकताच शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याने शेकापची ताकद वाढली आहे. रायगड सांगोला या बालेकिल्याच्या बोहर विस्तार करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या निमित्ताने शेकाप मराठवाड्याच्या मोहिमेवर निघाली आहे. मराठवाड्यातील आठही जि.प. निवडणुकीत शेकाप नशिब आजमावणार आहे. एकीचे बळ दाखवण्यासाठी डाव्याची भक्कम साथ ते घेणार आहेत. औरंगाबादची जि.प. निवडणूक शेकापचे नेते विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय डाव्या आघाडीने घेतला आहे. शेतकरी कामगार पक्षाने 35 गटासाठी उमेदवार शोधले आहेत तर उर्वरित गट, गणात भाकपकडे चार गट आणि गणात उमेदवार आहेत. स्थानिक नेत्यांची बैठक होऊन आघाडी, जागांवर चर्चा झाल्यानंतर मित्र पक्षांना देऊन उर्वरित जागा शेकाप लढवणार आहे. 

शेकापची "ब्रिगेड' 
प्रवीण गायकवाड यांच्या शेतकरी कामगार पक्षातील प्रवेशामुळे संभाजी ब्रिगेडला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या पाठोपाठ हजारो संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, पदाधिकारी शेकापत प्रवेश करत आहेत.  भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम या प्रमुख पक्षांसह आता त्यात नव्याने संभाजी ब्रिगेड, शेकाप, डावी आघाडी, बसपा या पक्षांची भर पडली आहे. प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी शेकाप-डाव्या आघाडी युतीच्या प्रचाराची धुरा स्वःत आमदार जंयत पाटील आणि प्रवीण गायकवाड सांभाळणार आहेत. शेकापने दुष्काळी मराठवाड्यात नद्यांचे खोलीकरण, विद्यापीठाच्या वस्तीगृहात राहणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील 600 विद्यार्थ्यांना वर्षेभर मोफत अन्न पुरवत डबे देण्याचा अभिनव उपक्रम राबवला होता. 

Web Title: leftist jump into zp fray