अंबाजोगाई तालुक्‍यात बिबट्या आढळला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

अंबाजोगाई - येल्डा (ता. अंबाजोगाई) परिसरात शनिवारी दुपारी एका शेतकऱ्यास बिबट्या दिसला. ही माहिती सर्वत्र कळताच वनविभागाचे अधिकारी येथे दाखल झाले; परंतु तोपर्यंत बिबट्या इतरत्र पसार झाला.

अंबाजोगाई - येल्डा (ता. अंबाजोगाई) परिसरात शनिवारी दुपारी एका शेतकऱ्यास बिबट्या दिसला. ही माहिती सर्वत्र कळताच वनविभागाचे अधिकारी येथे दाखल झाले; परंतु तोपर्यंत बिबट्या इतरत्र पसार झाला.
येल्डा परिसरातील शेंडगे वस्तीजवळ शनिवारी एक शेतकरी जनावरे घेऊन निघाला होता. दुपारच्या सुमारास हा बिबट्या शेतकऱ्याला दिसला. त्याने ही माहिती गावातील नागरिकांना व वनअधिकाऱ्यांना दिली. या वस्तीतील काही लोकही या ठिकाणी जमा झाले. त्यांनीही हा बिबट्या पाहिला.

सायंकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. वरवडे त्या ठिकाणी दाखल झाले. त्या वेळी हा बिबट्या एका झाडाच्या आळ्यात बसला होता. वनविभागाचे पथक जवळ जाताच बिबट्या उडी मारून ममदापूरच्या (परळी) दिशेने जंगलात पसार झाला.

Web Title: leopard in ambajogai