बिबट्या पुन्हा दिसला! शेतकरी, ग्रामस्थ भयभयीत

कमलेश जाब्रस
Saturday, 2 January 2021

शहरापासून जवळच असलेल्या मनुर गावच्या शेत शिवारात काम करणा-या महिलांना शुक्रवारी शुक्रवारी बिबट्या दिसला

माजलगाव (जि.बीड): शहरापासून जवळच असलेल्या मनुर गावच्या शेत शिवारात काम करणा-या महिलांना शुक्रवारी शुक्रवारी बिबट्या दिसला. त्यामुळं परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती महसूल विभागामार्फत वन विभागाला देण्यात आली आहे.

मागील एक महिण्यांपूर्वी देखील शहरपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगांव शिवारात बिबट्या शेतक-याना आढळून आला होता. परंतू वन विभागाच्या अधिका-यांनी तो बिबट्या नसून तडस असल्याचा निर्वाळा पायांचे ठसे बघून दिला होता. त्यानंतर तालुक्यात कुठेही बिबट्याचे दर्शन झाले नाही.

Gram Panchayat Election: पहिल्याच दिवशी 14 उमेदवारांची माघार; आता प्रतिक्षाची सोमवारची

शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मनूर शिवारात महिला मजूर शेतात काम करीत असतांना त्यांना बिबट्या आढळून आला. भितीपोटी या महिलांनी याठिकाणाहून पळ काढत घरजवळ केले. याची माहिती महसूल प्रशासनाला दिल्यानंतर तलाठी, मंडळाधिका-यांनी घटनास्थळी भेट देत वनविभागाला माहिती दिल्यास दुपारी चार वाजता वनविभागाच्या टीमने देखील भेट दिली, परंतू कोरडवाहू जमिनीत पायांचे ठसे नीट न उमटल्याने बिबट्या की दुसरे काही याचा निर्वाळा करण्यास वनविभागाला देखिल वेळ लागणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील १८ एसआरपी जवानांना विशेष सेवा पदक मंजूर​

घटनेची माहिती मिळताच तलाठी, मंडळाधिका-यांनी घटनास्थळी दिली. त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले आहे. वनविभागाने सांगीतल्यानंतर यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. - वैशाली पाटील, तहसिलदार.

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard seen again Farmers villagers in fear