
Leopard spotted in Nagaral Shivar; farmer escapes, villagers live in fear.
Sakal
-अनिल कदम
देगलूर: गेल्या चार ते पाच दिवसापासून देगलूरपासून पाच किमीवर असलेल्या तेलंगणातील मदनुर मंडळामध्ये व अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर कांही नागरिकांच्या दृष्टीस बिबट्या पडला. यासंदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल झाल्याने सीमेलगत असलेल्या देगलूर, भक्तापूर, पिंपळगाव, नागराळ या गावातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या मुक्त संचाराची अधिकृत माहिती हात्ती आली नसली तरी समाज माध्यमावरील व्हायरल झालेल्या पोस्टला तहसीलदार श्री भरतराव सूर्यवंशी यांनी दुजेरा दिला.