कांद्याला कवडीमोल भाव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

औरंगाबाद - यंदा कांद्याचे उत्पादन चांगले झाले; मात्र बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या कांद्याला क्‍विंटलमागे तीनशे ते पाचशे रुपये असा अल्प भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. 

दरवर्षी उन्हाळ्यात कांद्याला चांगला भाव मिळतो; पण यंदा परिस्थिती उलट आहे. बाजार समितीत कांदा 300 ते 500 रुपये क्‍विंटलने खरेदी केला जात आहे. तोच किरकोळ बाजारात दहा ते पंधरा रुपये किलोने विक्री होत आहे; मात्र शेतकऱ्यांकडून खरेदीच्या वेळी पाचशेच्या आत खरेदी केला जात असल्याने त्यातून शेतकऱ्यांना किलोमागे केवळ तीन ते पाच रुपये मिळू लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याच भावात शनिवारी कांद्याची बाजार समितीत विक्री झाली. जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, गंगापूर, लासूर येथून 600 ते 700 क्‍विंटल कांदा विक्रीसाठी बाजार समितीत येत आहे; मात्र कांदा दर्जेदार नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांतर्फे दर पाडण्यात आला आहे. यामुळे कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत. 

Web Title: less price for onion in the market