मुलांना सुट्या उपभोगू द्या, उन्हाळी वर्ग बंद करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

औरंगाबाद - "इयत्ता दहावी आणि बारावी वगळता अन्य विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद उपभोगता आला पाहिजे, यासाठी हे दोन वर्ग वगळता इतर विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी वर्ग घेण्याची पद्धत बंद करावी,' अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांना शिष्टंमडळाने निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले, की खासगी शिकवणी घेणाऱ्यांनी उन्हाळी वर्ग घेण्याची एक नवीन पद्धत आणली आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी उन्हाळी वर्ग समजण्याजोगी बाब आहे. मात्र, उखळ पांढरे करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे प्रवेश आपल्याच शाळेत राहावेत यासाठी पहिली ते दहावी व अकरावी ते बारावी उन्हाळी वर्ग घेण्याची शैक्षणिक संस्थांनी क्‍लृप्ती काढली आहे. वर्षभर अभ्यासातून येणाऱ्या तणावातून विद्यार्थ्यांना थोडासा विरंगुळा मिळावा. नातेवाइकांच्या भेटी व्हाव्यात, खेळ खेळता यावेत व त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा सुट्यांचा हेतू आहे. मात्र, शैक्षणिक संस्थांनी स्वार्थासाठी या हेतूला बगल दिली आहे, ही गंभीर बाब आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांनी लक्ष घालून शैक्षणिक संस्था व खासगी शिकवण्यांचे उन्हाळी वर्ग बंद करण्याचे आदेश द्यावेत; अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकार मिळवून देईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्यावर शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, सतीश कटकटे, मनोज उबाळे, सुनीता सोनवणे, आशा भालेराव, संजय लोहिया, सुषमा यादिगे, कल्पना जोशी, बलराज जाधव, रणजित दाभाडे, विनय बक्षी, आनंद गोदाम, पंकज शेलार, गणेश अंबिलवादे, सचिन रिडलॉन, श्‍याम डिडोरे, महेश मल्लेकर, रवींद्र लोढा, रोहित कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Web Title: Let the children sing for holidays