गरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य 

विनायक हेंद्रे
Tuesday, 31 March 2020

येथील वाडीमध्ये सचिन पेंढारकर, पोलिस निरीक्षक विकास थोरात यांच्या हस्ते गरजूंना गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, चटणी, मीठ, हळद, जिरे आदी सामाना बरोबर हात धुण्यासाठी साबण इतर दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटपही करण्यात आले. 

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असतानाही त्या वस्तू पैशाअभावी खरेदी करता येत नाहीत. गरजूंची ओढाताण बघून येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पेंढारकर यांनी मंगळवारी (ता.३१) परिसरातील एक हजार गरजू कुटुंबीयांना महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. त्यामुळे गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पहावयास मिळाले. 

आखाडा बाळापूर येथील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या सचिन पेंढारकर यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी एक हजार कुटुंबांना धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परिसरातील गरजू लाभार्थींची माहिती एकत्र करण्यास सुरुवात केली. 

हेही वाचारेल्‍वे रुळाने पायी चालत राजस्‍थानी मजूरांचा प्रवास

दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटप

आखाडा बाळापूर तसेच परिसरात राहणाऱ्या गरजू व्यक्तींची माहिती घेण्यात आली. मंगळवारपासून धान्य वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. येथील वाडीमध्ये सचिन पेंढारकर, पोलिस निरीक्षक विकास थोरात यांच्या हस्ते गरजूंना गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, चटणी, मीठ, हळद, जिरे आदी सामाना बरोबर हात धुण्यासाठी साबण इतर दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटपही करण्यात आले. 

उपक्रमाचे गावकऱ्यांतून कौतुक

या वेळी सचिन पेंढारकर मित्र मंडळासह शिवराम राऊत, बालाजी गिरगावकर, संदीप पेंढारकर, बाळू साखरे, शेख जावेद, संजय पांढरे, दीपक पवार, गोविंद लासे, शेख अझर, राम साखरे, चंद्रकांत पेंढारकर, अमोल नरवाडे, संतोष पाटेकर, अमोल खरवडे, मयूर कल्याणकर, समर्थ पेंढारकर, सुरेश पेंढारकर, नागेश साखरे, गोविंद ठमके आदींची उपस्थिती होती. गरजूंना पुढील एक महिना पुरेल एवढे धान्य मिळाल्यामुळे गरजूंची मोठी सोय झाली आहे. श्री. पेंढारकर यांच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांतून कौतुक केले जात आहे.

येथे क्लिक कराकांदा बीजोत्‍पादनाला अवकाळीचा फटका

माजी आमदार गजानन घुगे यांच्या तर्फे मदत

आखाडा बाळापूर : येथे माजी आमदार गजानन घुगे यांच्यातर्फे गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यात पीठ, तांदूळ, दाळ, तेल, साखर, पती, मीठ, साबण, हळद, बेसण आदी किराणा सामानाचा समावेश आहे. या वेळी माजी आमदार गजानन घुगे, भाजपचे जिल्‍हा सचिव महेंद्रसिंह बायस, भाजपच्या महिला जिल्‍हा उपाध्यक्षा पुष्पा शिंदे यांच्यासह ज्ञानेश्वर चोरमारे, अंजु पाटील हेंद्रे, सतिष हेंद्रे, संतोष काळे, बालासाहेब हेंद्रे, श्रीमती जाधव आदींची उपस्थिती होती. श्री. घुगे यांनी या वेळेस सर्वांना सरकारच्या आदेशानुसार लॉकडाऊन पाळण्याच्या सूचना केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A smile on the face of the needy Hingoli news