औरंगाबाद मध्य : एमआयएमची कुरघोडी, शिवसेनेला धक्का | Election Results 2019

Naser Siddhiqi
Naser Siddhiqi

औरंगाबाद - औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांची तब्बल 30 हजार मतांची आघाडी एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दिकी यांनी तोडली असून,  15 व्या फेरीत नासेर सिद्दिकी यांना 2837 मतांची आघाडी घेतली. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

औरंगाबाद मध्य मतदारसंघाची अशी आहे पार्श्‍वभूमी 
मतदारसंघ पुरनर्रचनेत सन 2009 विधानसभा निवडणुक हा मतदारसंघ अस्तित्वा आला. त्यावेळी शिवसेनेत असलेले प्रदीप जैस्वाल यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करुन मैदानात उडी घेऊन विजय मिळविला होता. त्यावेळी प्रदीप जैस्वाल, राष्ट्रवादीचे कदीर मौलाना, शिवसेनेचे विकास जैन यांच्यात तिरंगी लढत झाली होती. प्रदीप जैस्वाल यांना 49 हजार
935, राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांना 41 हजार 583 तर शिवसेनेचे विकास जैन यांना 33 हजार 988 मते मिळाली होती. 

2014 मध्ये शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये काडीमोड होऊन सर्वच पक्ष मैदानात उतरले होते. यावेळी झालेल्या चौरंगी लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळविला होता. इम्तियाज जलील यांना 61 हजार 841 मते मिळाली होती त्याखालोखाल शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल 41 हजार 831, भाजपचे किशनचंद तनावणी 40 हजार 770 तर राष्ट्रवादीचे विनोद पाटील यांना 11 हजार, 842 मते मिळाली होती.  या मतदारसंघात शहरातील जुना भाग आणि नवीन असा दोन्ही भाग येत असल्याने यामध्ये हिंदु, मुस्लिम, दलित समाजाची मते निर्णायक आहे. यामध्ये मुस्लिम समाजाची मते ही मोठ्या संख्येने असल्याने 2014 च्या मतविभाजनात येथे एमआयएमचा उमेदवार विजयी झाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com