सिद्धार्थ उद्यानातील प्रवेशालाच अडथळा, 15 झाडांचा बळी, धबधब्यालाही धक्का

माधव इतबारे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सिद्धार्थ उद्यानातील बंद बीओटी प्रकल्पाचे काम अखेर सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे उद्यानाची रयाच जाणार असून, प्रशासनाने उद्यान अधीक्षकांच्या दालनापर्यंतची जागा विकासकाला दिली आहे. त्यामुळे त्यांना उद्यानात प्रवेश करण्याचेदेखील वांधे होणार आहेत. तसेच 15 झाडांचा बळीही दिला जाणार आहे. 60 लाख रुपये खर्च करून नव्यानेच तयार करण्यात धबधब्यालाही धक्का लागणार लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यानातील बंद बीओटी प्रकल्पाचे काम अखेर सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे उद्यानाची रयाच जाणार असून, प्रशासनाने उद्यान अधीक्षकांच्या दालनापर्यंतची जागा विकासकाला दिली आहे. त्यामुळे त्यांना उद्यानात प्रवेश करण्याचेदेखील वांधे होणार आहेत. तसेच 15 झाडांचा बळीही दिला जाणार आहे. 60 लाख रुपये खर्च करून नव्यानेच तयार करण्यात धबधब्यालाही धक्का लागणार लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

महापालिकेने शहरातील कोट्यवधी रुपये किमतीच्या मोक्‍याच्या जागा "बीओटी' (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर विकासकांना दिल्या आहेत; मात्र तब्बल दहा वर्षांनंतरही अनेक प्रकल्प अपूर्णच आहेत. सिद्धार्थ उद्यानातील प्रकल्पासाठी 2009 मध्ये करार करण्यात आला; मात्र विकासकांमधील वादामुळे इमारतीचे केवळ सांगाडे उभे आहेत. या प्रकल्पासाठी महापालिकेने 2006 मध्ये सात हजार चौरस मीटर जागा प्रकाश डेव्हलपर्स ऍण्ड जे. व्ही. नाशिक या कंत्राटदारासोबत करारनामा केला. 2009 मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होता; मात्र 2019 चे अर्धे वर्ष संपलेले असतानाही प्रकल्पाचे पूर्ण झालेले नाही. विकासकाला दोन हजार 373 चौरस मीटर जागा देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले असले, तरी उद्यानाचा रस्त्यालगतचा संपूर्ण भाग ताब्यात घेण्यात आला आहे. बंद असलेले काम सध्या सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने दिलेली जागा उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयाच्या पायऱ्यांपर्यंत जात आहे. त्यामुळे उद्यान अधीक्षकांनी प्रवेश करायचा कुठून, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बसस्थानकाच्या बाजूने पाच फुटांचा रस्ता देण्याचे उपकार विकासक करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सिद्धार्थ उद्यानात 60 लाख रुपये खर्च करून धबधबा उभारला आहे. या धबधब्यालादेखील बीओटी प्रकल्पामुळे धक्का लागणार आहे. उद्यानात पाच चिंचेच्या झाडांसह इतर 15 झाडांचा बळी या प्रकल्पासाठी दिला जाणार आहे. 
 
पाण्याची टाकी, भांडार पाडणार 
सिद्धार्थ उद्यानात जुनी पाण्याची टाकी आहे. उद्यान अधीकाक्षकांच्या दालनाशेजारीच उद्यान विभागाचे भांडार आहे. या दोन्ही मालमत्ता बीओटी प्रकल्पासाठी पाडल्या जाणार आहेत. त्यासाठी मात्र महापालिकेच्या कुठल्याही सभागृहाची परवानगी घेण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: letest news about Siddharth Garden