गैरसमजुतीतून साथ सोडणाऱ्या अन्वर यांची समजुत काढू - फौजिया खान

राजेभाऊ मोगल
रविवार, 30 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य, खासदार तारिक अन्वर यांनी गैरसमजुतीमधून पक्षाला सोडचिठ्ठी देत संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही त्यांची समजूत काढू, अशी माहिती पक्षाच्या नेत्या, आमदार फौजिया खान यांनी येथे दिली. राफेल विमान खरेदीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्‍तव्य चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. पक्षातर्फे सुरू झालेले 'संविधान बचाव, देश बचाव' अभियान नऊ ऑक्‍टोबरला येथे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शरद पवार येणार आहेत. 

याबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी (ता. 29) झालेल्या पत्रकार परिषदेत फौजिया खान म्हणाल्या, भगवी मानसिकता असलेले सरकार सत्तेवर आल्यापासून संविधानाचा सन्मान केला जात नाही. लोकशाहीचे तत्त्वही पायदळी तुडविण्याचे कारस्थान सतत पाहायला मिळत आहे. त्यामुळे संविधानाच्या समर्थनार्थ देशभरात अभियान राबवीत आहोत. मुंबई, नागपूर, नाशिकनंतर आता येथे हे अभियान होत आहे. त्यासाठी राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित राहतील. देशभरातील 17 पक्षांच्या नेत्यांनी इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्राला (ईव्हीएम) आक्षेप घेत जुन्याच पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली आहे. त्याकडे लक्ष दिले जात नाही. भाजपच्या विरोधात कुणी बोलले, तर देशद्रोहाची भीती दाखविली जाते. संविधानाची प्रत जाळणाऱ्यांबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीत, असेही त्या म्हणाल्या. 

यावेळी आमदार विद्या चव्हाण, सुधाकर सोनवणे, काशिनाथ कोकाटे, इसाक पटेल, अनुपमा पाथ्रीकर, मेहराज पटेल, अंकिता विधाते आदी उपस्थित होते. 

मुस्लिम, दलित आमच्यासोबत

सध्या मुस्लिम, दलित समाजाची वेगळी मोटबांधणी करण्यात येत आहे. हा समाज का व कशासाठी आपल्यावर नाराज आहे, असे विचारले असता, फौजिया खान म्हणाल्या, कुणी काहीही केले तरी मुस्लिम, दलित समाज आमच्यासोबतच असेल. मुळात धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणारेच धर्मांध पक्षासाठी काम करीत असल्याचा संशय येत आहे. त्यामुळे त्यांच्याच भूमिका संशयास्पद असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's understand Anwar : Faijiya Khan