'नाथभाऊला मंत्रीपद द्या; अन्यथा भाजपला हिसका दाखवू'

प्रकाश बनकर
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

खडसे भाजपातच 
मध्यतरी एकनाथ खडसे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीत खडसे प्रवेश करतील अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या, पण तसे काही घडले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत खडसेंचा मूड कसा असणार हे येणारा काळच ठरवेल. मोठे पद देवून भाजपाने त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी रमेशदादा पाटील यांनी केली आहे.

औरंगाबाद : लेवा पाटीदार समाजाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना एकांगी करीत, त्यांना राजकीय वनवासात टाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. राज्यात समाजाचे मोठे संख्याबळ असतानाही भाजप अन्याय करीत आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
समाज नाथाभाऊच्या पाठिशी उभा आहे. भाजपने त्यांच्या मंत्रीपद देण्याचा निर्णय लवकर द्या अन्यथा येणाऱ्या निवडणूकीत लेवा पाटीलत्यांना हिसका दाखवेल. असे लेवा पाटीदार समाजाचे कुटुंब प्रमुख रमेश पाटील यांनी रविवारी (ता.25) सांगितले. 
औरंगाबादेतील सिडको मधील सौभाग्य मंगल कार्यालयात लेवा पाटीदार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा परिचय कार्यक्रम घेण्यायत आला.

या कार्यक्रमानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, राज्यात लेवा पाटीदार समाज 30 ते 35 लाखांवर आहे. तीन आमदार व एक खासदार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांना न्यायालयात दिलासा दिला. यानंतरही त्यांना भाजपाने मंत्रीपदापासून दूर ठेवले. राज्यात ते नंबर दोनचे नेते मानले जातात. त्यानी पक्षाला राज्यात जनाधार मिळवून दिले. सत्ता आल्यानंतर त्यांच्यासोबत अंतर्गत कुरघोड्या चालू झाल्या. मंत्रीपदी असताना जनतेच्या हीताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते. यामूळे त्यांना असे राजकीय वनवासात टाकण्याची गरज नाही. यामूळे भाजपने त्यांच्या मंत्रीपदाचा निर्णय लवकर मार्गी लावावा, अन्यथा पक्षाला समाजाच्या रोषाला समोरे जावे लागेल. असेही पाटील यांनी सांगितले. 

खडसे भाजपातच 
मध्यतरी एकनाथ खडसे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीत खडसे प्रवेश करतील अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या, पण तसे काही घडले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत खडसेंचा मूड कसा असणार हे येणारा काळच ठरवेल. मोठे पद देवून भाजपाने त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी रमेशदादा पाटील यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leva patil community demand on Eknath Khadse in BJP