esakal | जीवनदायी नदी ठरते जीवघेणी: अनेकजण गेले वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनदायी नदी ठरते जीवघेणी: अनेकजण गेले वाहून

जीवनदायी नदी ठरते जीवघेणी: अनेकजण गेले वाहून

sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत: तालुक्यातील अनेक महत्वाच्या गावांना जोडणाऱ्या व प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या सिरळी रस्त्यावरील नदीची उंची कमी असल्याने नागरीक प्रवाशांना धोकादायक ठरत आहे. एरवी नदीकाठच्या गावाची तहान भागवणारी ही नदी पुर आल्यानंतर जीवघेणी ठरते आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाकार्याध्यक्ष तथा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नागोराव जांबुतकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन सदरील पुलाचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी केली.

हेही वाचा: अतिवृष्टीसाठी मुख्यमंत्री देतील वेगळा निधी : अब्दुल सत्तार

वसमत तालूक्यातील वाई-सिरळी-बोल्डा हा रोड बाळापूर, कळमनूरी, हिंगोली, वसमत, औंढा, या बाजार पेठेसी जोडनारा मूख्य मार्ग आहे. या मार्गावर नेहमीच रात्रंदिवस रहदारी मोठ्या प्रमाणात चालू असते. परंतू खरी अडचण पावसाळी हंगामात येते. पावसाळ्यात पाऊस पडू लागल्यामूळे या परिसरातील पिंपरी, मरसूळ, राजवाडी, सिरळी, वापटी, पांग्रा शिंदे, बोल्डा या गावालगत असलेल्या नद्यांना मोठ्या प्रमानात पुर येतो. त्यामूळे या मार्गावरील वाहतूक पूर्णता: ठप्प होत असते.

तसेच या नद्याच्यां पूलवरून पानी वाहत असल्यामूळे वाहधारकांना, गावातील नागरिकांना, तासनतास या पूलावरच ताटकळत बसावे लागते. अशावेळी रूग्णाला उपचारासाठी नेताना बेहाल होतात. दोन वर्षापुर्वी अशाच पावसाच्या पूराचे पाणी पुलावरुन वाहत असताना रूग्नाला दवाखान्यात नेता आले नाही. परिणामी त्या रूग्नाने वाहनातच दम तोडला होता. तर गतवर्षी आमदरी येथील यूवकास पाण्याचा अंदाज न आल्यामूळे, मोटरसायकलसह वाहून गेला. यात ऐकाचा जीव वाचला तर एका युवकास जीव गमवावा लागला.

हेही वाचा: गेवराई तालुक्यात तलावाला पाडले भगदाड, ग्रामस्थ संतापले

या वर्षी पांग्रा शिंदे येथील पूरामूळे पूलावरून पानी वाहत होते सायंकाळची वेळ होती. वापटी येथील जीप चालक व इतर दोघे असे तिघे जण पावसामूळे पूलावरून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामूळे जीपसह पूराच्या पाण्यातच वाहून गेले. दोन तासाच्या अथक प्रयत्नाने त्या जीपमधील व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. त्यामूळे जीवीतहानी झाली नाही परंतु, जीप वाहून गेल्याची घटना घडली. या मार्गावरील पूलाची ऊंची खूपच कमी असल्यामुळे जीवघेने प्रकार बऱ्याच वर्षापासून चालत आहेत.

दरम्यान भविष्यात होणारे अपघात टाळावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष तथा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नागोराव जांबुतकर यांनी थेट मंत्रालय गाठून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यानां निवेदन देऊन सदरील धोकादायक बनलेल्या पुलाचे नव्याने बांधकाम करावे अशी मागणी केली आहे.

loading image
go to top