अत्याधुनिक मीटर मधून होणारी वीजचोरी उघड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

- वीजग्राहकांसाठी 'रेडिओ फ्रिक्वेंसी' आणि 'इंफ्रारेड' असे अत्याधुनिक ईलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत.

- परंतु, या मीटरमध्येही फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या नांदेड शहरातील तीन वीज ग्राहकांची वीजचोरी रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे (डीसीयू) उघडकीस आणण्यात आली आहे.

नांदेड : वीजग्राहकांसाठी 'रेडिओ फ्रिक्वेंसी' आणि 'इंफ्रारेड' असे अत्याधुनिक ईलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, या मीटरमध्येही फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या नांदेड शहरातील तीन वीज ग्राहकांची वीजचोरी रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे (डीसीयू) उघडकीस आणण्यात आली आहे.

या प्रणालीद्वारे शहरातील आनंदनगर शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शोभानगर परिसरातील अब्दुल समद मोहमंद अब्दुला यांनी दोन हजार ३२ युनीट चोरी, मजहर हुसेन शेख हुसेन पाचशे ऐंशी युनीट आणि जमीर पठाण (इगल अक्वा) चार हजार युनीटची चोरी केली. त्यांनी सहा हजार 882 युनिटची वीजचोरी केली असून त्याची अनुमानित रक्कम एक लाख तीन हजार पाचशे नव्वद रुपये आहे. सदर वीज ग्राहकांविरूध्द विद्युत अधिनियम-२००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नांदेड शहरामध्ये सिंगलफेज मीटर असलेल्या एक लक्ष 15 हजार 152 वीजग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत. तसेच देगलूर शहरामध्ये अकरा हजार 90 वीजग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत. परभणी जिल्ह्यातील सहा शहरांमध्ये सिंगलफेज मीटर असलेल्या  एकोणनव्वद हजार 445 वीजग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत. यामध्ये परभणी शहरातील बावन्न हजार 398 तर पुर्णा शहरात पाच हजार 239, गंगाखेड शहरात नऊ हजार 342, जिंतूर शहरामध्ये सहा हजार 938, पाथरी शहरात पाच हजार 371 तसेच सेलू शहरामध्ये दहा हजार 157 वीजग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत.

हिंगोली जिल्हयातील हिंगोली शहरामध्ये सिंगलफेज मीटर असलेल्या सत्रा हजार 340 वीजग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत. तसेच वसमत शहरामध्ये दहा हजार 935 वीजग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: light is being stolen even from latest meters

टॅग्स