

LIGO India Hingoli
esakal
पुणे : गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (लायगो इंडिया) या खगोलशास्त्रीय महाप्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे.
लायगो वेधशाळेच्या उभारणीचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) कंपनीला यंदाच्या फेब्रुवारीमध्ये मिळाले होते. २०३० पर्यंत हा प्रकल्प उभा राहणार असल्याचे प्रकल्पाचे प्रवक्ते आणि वरिष्ठ खगोल शास्त्रज्ञ प्रा. संजीत मित्रा यांनी सांगितले.
गुरुत्वीय लहरींचा वेध घेणाऱ्या लायगो (अमेरिका आणि भारत), व्हर्गो (युरोप) आणि कागरा (जपान) या वेधशाळांमधील खगोलशास्त्रज्ञांची संयुक्त परिषद २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान पुण्यातील आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिकशास्त्र केंद्रात (आयुका) आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने बोलताना प्रा. मित्रा यांनी भारतातील लायगो प्रकल्पाच्या तयारीची माहिती दिली.
ते म्हणाले, ‘‘हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथजवळील १७४ एकर जागेवर लायगो ही गुरुत्वीय लहरींचा वेध घेणारी अद्ययावत आणि संवेदनशील वेधशाळा उभारण्यात येत आहे. या वेधशाळेमध्ये कंपनरोधक बांधकामावर प्रत्येकी चार किलोमीटर लांबीचे निर्वात बोगदे तयार करण्यात येतील.
‘एल अँड टी’ कंपनीने वेधशाळा उभारणीचे कंत्राट मिळाल्यानंतर लगेचच बांधकामाला सुरुवात केली आहे. सध्या या रचनेसाठी आवश्यक सपाट आणि समतल पृष्ठभाग तयार करण्याचे काम सुरू आहे. ४८ महिन्यांत म्हणजे २०३० पर्यंत वेधशाळेची उभारणी पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.