esakal | धक्कादायक ! अन् अंत्ययात्रा आणली तहसील आवारात !
sakal

बोलून बातमी शोधा

kailas rath.jpg

लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीला रस्ता नाही, अतिक्रमण हटवा अशी मागणी करीत किल्लेधारुर तहसील कार्यालयासमोर अंत्ययात्रा आणण्यात आली. 

धक्कादायक ! अन् अंत्ययात्रा आणली तहसील आवारात !

sakal_logo
By
प्रकाश काळे

किल्लेधारूर (बीड) : येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर गुरुवारी (ता.२७) पुन्हा प्रेतयात्रा तहसील कार्यालयात  नेण्यात आल्याची घटना घडली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

शहरातील लिंगायत समाजाची स्मशानभुमी तहसील कार्यालयाच्या दक्षिणेस आहे. सर्वे नं. ३७८ मध्ये ०.९९ आर जमीन लिंगायत समाजाची स्मशानभुमीसाठी आहे. या जमिनीत लिंगायत समाजाच्या वतीने परंपरेनुसार दफनविधी करुन अंत्यविधी केला जातो. परंतू स्मशानभुमीकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या ६ मीटर रस्त्यावर अतिक्रमण असल्याने जेसीबी किंवा तत्सम वाहन, शववाहिका नेण्यास अडचणी येतात. यासाठी गेल्या दोन वर्षांपासुन लिंगायत समाज सतत आंदोलन करुन रस्त्याची मागणी करत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यापुर्वीही (ता.४) मार्चला लिंगायत समाजाच्या वतीने चक्क तहसील कार्यालयात अभ्यागत कक्षात दोन तास प्रेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाकडून कारवाई झाली. नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी आंदोलकांची समज काढून प्रकरण तुर्त शांत करत येत्या ३१ आँगस्ट पर्यंत स्मशानभुमीचा रस्ता मोकळा करुन देण्याचे आश्वासन दिले. यानंतर इतर रस्त्याने प्रेतयात्रा नेत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मंडळ अधीकारी श्री. कुरेशी सह महसुल कर्मचारी व लिंगायत समाजाचे नागरीक होते.
 

(संपादन-प्रताप अवचार)