महामोर्चात सहभागाचे वाहन रॅलीद्वारे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

औरंगाबाद - लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी रविवारी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी शनिवारी (ता.सात) वाहन रॅली काढण्यात आली होती.

क्रांती चौकातून दुपारी बारा वाजता कर्नाटक येथील चन्नबसवण्णास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही रॅली काढण्यात आली. ही रॅली पैठण गेटमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, टी.व्ही. सेंटर, एम- २ रोड, सिडको बसस्थानक, जयभवानीनगर, गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ती चौकमार्गे बसवेश्‍वर चौक (आकाशवाणी) येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत जिल्हा समन्वयक प्रदीपअप्पा बुरांडे, वीरेंद्र मंगलगे, वीरभद्र गादगे, दीपक उरगुंडे, डॉ. प्रदीप बेंजरगे, गुरपादआप्पा पदशेट्टी, ज्ञानेश्‍वर आप्पा खर्डे, नगरसेवक सचिन खैरे, विश्‍वनाथ स्वामी, आत्माराम पाटील, सचिन संगशेट्टी, राजेश कोठाळे, गणेश वैद्य, अभिजित घेवारे, भरत लकडे, गणेश कोठाळे, शिवाप्पा गुळवे, शिवा खांडकुळे, चंपाताई झुंजारकर, जयश्री लुंगारे, सुंदरताई सुपारे, कैलास पाटील, प्रीती गुळवे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, महामोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

Web Title: lingayat society rally