‘लायन्स’ देते विस रुपयात नवीदृष्टी

शिवचरण वावळे
बुधवार, 15 जानेवारी 2020

ज्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणाची सोय नसेल अशा व्यक्तीने पैसे आणावेत तरी कुठुन? हा प्रश्न असतो. त्यामुळे अनेकजण पैसे नाहीत म्हणून डोळ्यांचे आजार लपवतात आणि शेवटी त्या रुग्णास मोतीबिंदू, काचबिंदू होऊन डोळ्यांची दृष्टी कमी होते. यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी लहानात लहान हॉस्पीटलमध्ये २८ ते ५० हजार रुपयापर्यंत खर्च येतो.

नांदेड : डोळ्यांची जळजळ होत असेल आणि डॉक्टर्सकडे डोळे तपासण्यासाठी गेल्यास किमान आडीचशे ते तीनशे रुपये मोजावे लागतात. ही रक्कम जास्त नसली तरी, डोळ्यांची खबरदारी घेण्यासाठी कुणी म्हणत देखील नाही. मात्र, ज्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणाची सोय नसेल अशा व्यक्तीने पैसे आणावेत तरी कुठुन? हा प्रश्न असतो. त्यामुळे अनेकजण पैसे नाहीत म्हणून डोळ्यांचे आजार लपवतात आणि शेवटी त्या रुग्णास मोतीबिंदू, काचबिंदू होऊन डोळ्यांची दृष्टी कमी होते. यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी लहानात लहान हॉस्पीटलमध्ये २८ ते ५० हजार रुपयापर्यंत खर्च येतो.

हा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतो. मात्र, डोळ्यांच्या आजारावर कमीत कमी खर्चात उपचारासाठी अनेकजण शासकीय रुग्णालयात जातात. शासकीय रुग्णालयात ज्येष्ठांना खुपच धावपळ करावी लागते. इतके करुन देखील दोन- तीन दिवस कधीकधी आठ दिवस लागतात. तेव्हा कुठे डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी नंबर लागतो. ज्येष्ठांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी नंदीग्राम लायन्स ट्र्स्टच्या माध्यातून देशभरात १५२ नेत्र रुग्णालय कार्यरत आहेत. नऊ वर्षापूर्वी शहरातील जंगमवाडी येथे ‘लायन्स नेत्र’ रुग्णालयाची सुरवात झाली. 

हेही वाचाअशोक चव्हाणांचा पतंग आकाशी...

० रुपयात डोळ्याच्या मोती बिंदू आजारावर शस्त्रक्रिया

५१ सदस्य असलेल्या या रुग्णालयात पूर्वी दहा रुपयात तर, आता केवळ २० रुपयात डोळ्याच्या मोती बिंदू आजारावर शस्त्रक्रिया केली जाते. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. 
जंगमवाडी येथे अपुऱ्या जागेमुळे क्लबने सिडको येथे चार वर्षापूर्वी दुसरी शाखा सुरु केली आहे. ३० बेडचे ‘लायन्स नेत्र’ रुग्णालय अगदी प्रशस्त जागेत सुरु आहे. दोन्ही रुग्णालयात दिवसभरात ६०० पेक्षा अधिक बाह्य रुग्णांची तपाणी केली जाते. यातील ३० टक्के रुग्णांना काही ना काही डोळ्यांचे आजार असतात. तर दहा टक्के लोकांना मोतीबिंदू आजार झालेला असतो. हे रुग्णालय सुरु करण्यासाठी कै. डॉ. मोहन भालेराव, कै. डॉ. शाम मोतेवार आणि कै. सुरेशभाई ठक्कर यांनी प्रत्येकी एक लाख रुपयाचे योगदान देवून मोलाची कामगीरी केली होती. 

पारदर्शकतेसाठी तीन वर्षानी बदल 

‘लायन्स नेत्र’ रुग्णालयाची पारदर्शकता व विश्वासाहर्ता टिकवून ठेवण्यासाठी तीन वर्षानी एकदा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव, सदस्याची निवड केली जाते. सध्या अध्यक्ष म्हणून नित्यानंद मैया, उपाध्यक्ष दिलीप मोदी, सचिव धनंजय डोईफोडे तर कोषाध्यक्ष सुनिल भारतीया आहेत.

येथे क्लीक करा - अस्वलाने तोडले शेतकऱ्याच्या कानाचे लचके

उपचारानंतर अशी घेतली जाते काळजी

डोळे तपासणीसाठी ‘लायन्स नेत्र’ रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली जाते. त्या नंतर गरजवंत रुग्णास ठराविक दिवशी रुग्णालयात बोलावले जाते. यासाठी लायन्स नेत्र रुग्णालयाची रुग्णवाहिका मोफत पाठवली जाते. आलेल्या रुग्णावर एकादिवसात सर्व त्या तपासण्या केल्या जातात. दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली जाते. दरम्यान, त्यांना मोफत जेवण दिले जाते. दुसऱ्या दिवशी रुग्णवाहिकेतून सर्व रुग्णांना घरी पाठविले जाते. 

४० दिवसात तीनवेळा दृष्टीची तपासणी

डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्या रुग्णांना ४० दिवसांमध्ये ठराविक दिवसाच्या अंतरावर डोळे तपासणीसाठी फोन करुन बोलावण्यात येते. या ४० दिवसात तीनवेळा त्यांच्या डोळ्यांची दृष्टी तपासली जाते. त्यानंतर त्या रुग्णास त्यांना परवडेल अशा किंमतीत गोळ्या- औषध व चष्मा दिला जातो. यासाठी रुग्णास नाममात्र खर्च करावा लागतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Lions' offers renewal sean in 20 Rupees