अशोक चव्हाणांचा पतंग आकाशी... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

राज्याचे माजी मुख्यमत्री तथा सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना आवरता आला नाही. त्यांनी बुधवारी (ता. १५) मकर संक्रात आपल्या परिवारासह मुंबईस्थित निवासस्थानी पतंग उडवून साजरी केली. 

नांदेड : मकर संक्रांत हा सण जवळ येताच लहान- थोर मंडळी पतंग उडविण्याच्या जुन्या गोष्टींना उजाळा देतात. बच्चे कंपनी तर मागील पंधरा दिवसांपासून पतंगाला खिळून आहेत. त्यांना तर पतंग खेळण्याचा आनंद घ्यावा वाटतोच त्याउलट पतंग खेळण्याचा मोह राज्याचे माजी मुख्यमत्री तथा सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना आवरता आला नाही. त्यांनी बुधवारी (ता. १५) मकर संक्रात आपल्या परिवारासह मुंबईस्थित निवासस्थानी पतंग उडवून साजरी केली. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची राज्याच्या राजकारणात दमदार इन्ट्री झाली. नांदेड जिल्ह्यातील भोकर या त्यांच्या विधानसभा मतदार संघातून तब्बल ९७ हजार मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला होता. त्यानंतरच्या राजकिय वाटाघाटीत त्यांचा राज्याच्या मंंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्री म्हणून प्रवेश झाला. मंत्री झाल्यानंतर त्यांचा नांदेड दौरा कॉग्रेस कार्यकर्त्यांचा दिवाळी - दसरा ठरला. भोकर, धर्माबाद आणि नांदेड शहरात त्यांचा जंगी सत्कार झाला. त्यानंतर अशोक चव्हाण मुंबईला गेले. 

हेही वाचाबलात्कारप्रकरणी  नराधमास जन्मठेपेची शिक्षा

नामदार अशोक चव्हाणांनी साजरी केली संक्रांत 

आज मकर संक्रांतीनिमित्त त्यांनी आपल्या निवासस्थानी कुटुंबियासह सण साजरा केला. एवढेच नाही तर त्यांना पतंग खळण्याचा मोह आवरता न आल्याने हातात मांजा घेऊन त्यांनी आपला पतंग आकाशी पाठविला. ते पतंग उडवित असतांना त्यांचे अनेकांनी चित्र टिपले. अशोक चव्हाण यांच्याकडे राज्याचे नेतृत्व असतानाही ते आपला व्यायाम व छंद जोसापत. नांदेडला जरी त्यांचा मुक्काम पडला तर ते सकाळीच फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे शहरातील काही रस्त्याची दुर्दशा किंवा नाल्या, दिवाबत्ती याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. 

येथे क्लिक करा - मकर संक्रांत विशेष : कशासाठी आहे हा सण वाचा सविस्तर

पाच वर्षात नांदेडचा विकास खुंटला

त्यानंतर ते संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्याला सुचना देत ते काम निट करण्यास सांगतात. तसेच काही नागरिक त्यांना भेटतात. त्यांच्याकडूनही त्यांना काही सुचना मिळतात. त्या सुचनांचा आदर करत अशोक चव्हाण हे आपल्या शहरासाठी नेहमी कार्यरत राहतात. मंत्री झाल्यानंतर ते जेंव्हा नांदेडला आले तेंव्हा शासकिय विश्रामगृहात त्यांनी सत्काराला उत्तर देतांना मागील पाच वर्षात नांदेडचा विकास झाला नसल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र आता मी आलोय, शहराच्या विकासाला गती देऊन माग पडलेले विकासकामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन त्यांनी नांदेडकरांना दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan's kite skies ...