उदगीरच्या साहित्य संमेलनात होणार चार भाषेच्या साहित्यावर मंथन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan
उदगीरच्या साहित्य संमेलनात होणार चार भाषेच्या साहित्यावर मंथन

उदगीरच्या साहित्य संमेलनात होणार चार भाषेच्या साहित्यावर मंथन

उदगीर (जि. लातूर) - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) उदगीरला (Uadgir) होत आहे. उदगीर हे ठिकाण महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील केंद्र असून या भागातील साहित्य व साहित्यिकांना पारंपारिक इतिहास आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी, उर्दू , कन्नड व तेलगू भाषिक साहित्यिकाना सन्मान देऊन या चार साहित्यिवर मंथन होणार असल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील (Kautikrao Thale Patil) यांनी सकाळ शी बोलताना दिली आहे.

उदगीर हे महाराष्ट्र राज्यातील कर्नाटक,आंध्र प्रदेश व तेलंगाना सीमेलगतचे शेवटचे केंद्र आहे. पूर्वी निजाम काळामध्ये उदगीरचा भाग हैदराबाद संस्थानांमध्ये होता. त्या काळात या परिसरामध्ये उर्दू भाषा प्रचलित होती. त्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली असताना अनेक मराठी भाषिक नागरिक कर्नाटक भागात राहून गेले. मात्र या मराठी भाषिक आणि अद्यापही त्या भागात मराठी संस्कृती जपली असून मराठीतून साहित्य निर्मितीही केली आहे.

काही मराठी भाषिक साहित्यक आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात असून त्यांनी त्यांच्या बोली भाषेत मराठीसह साहित्य संस्कृती जपली आहे. या पर्यंत परिसराला निजाम काळाचा संदर्भ असल्याने अनेक उर्दू साहित्यिकही मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मितीचे काम करतात. या चार भाषेतील साहित्यिकांना या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्या साहित्यिकांनाही हे साहित्य संमेलन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे.

हेही वाचा: स्कॉलर आयआयटीएन ते डॅशिंग IPS, पंकज कुमावत यांचा प्रेरणादायी प्रवास

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी जरी असले तरी या सीमाभागातील साहित्य व संस्कृती जपण्यासाठी निर्माण होत असलेल्या बहुभाषिक साहित्यावर मंथन होणार आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन आत्तापर्यंतच्या साहित्य संमेलना पेक्षा आगळेवेगळे होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बहुभाषिक साहित्यिकांना संधी मिळणार असल्याने या भागातील साहित्यिकामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

सीमाभागातील परंपरेला बळकटी...

या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सीमाभागातील साहित्यिकांच्या व साहित्यप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीमुळे सीमाभागातील परंपरेची उजळणी होणार आहे. अनेक भाषेचे मिश्रण अनेक संस्कृतीचे मिश्रण व या भागातील बोलीभाषेला आलेले एक वेगळेपण याची संबंध उपस्थित श्रोते व साहित्य प्रेमींना माहिती होणार आहे.या भागातल्या परंपरांची पुन्हा उजळणी होणार असल्याने या परंपरा अधिक बळकट होणार आहेत. सीमाभागातले दुःख, समस्या, वेगळेपण व चांगुलपणा हे सर्यगुण या मंथनातून समोर येणार आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top