esakal | कर्जमाफीची खाती ‘होल्ड’वर, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

crop loan

कर्जमाफीची खाती ‘होल्ड’वर, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: कर्जमाफी मिळाल्यानंतरही जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची फरपट सुरूच आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नसल्याने अशा शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खातेच होल्ड केले जात आहेत. अशा शेतकऱ्यांची माहिती मिळताच रक्कम मागविता येईल, असे मत जिल्हा उपनिबंधकांनी व्यक्त केले आहे.

दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना राबविण्यात आली. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीच्या अनेक याद्या तयार करण्यात आल्या. यामध्ये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना लाभ देण्यात आले. जिल्ह्यातील शेकडो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेत लाभार्थी ठरले आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! खासगी गाड्यांवर 'महाराष्ट्र शासन' नावाचा सर्रास गैरवापर

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला असला तरीही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे खाते होल्ड केले जात आहे. म्हणजे शासनाकडून जोपर्यंत त्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत संबंधित शेतकऱ्याला त्या खात्यावर व्यवहार करता येत नाहीत. परिणामी, अनेक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. काही शेतकऱ्यांनी ठिबक संच खरेदी केले आहेत. त्यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात रक्कम खात्यावर जमा होते. मात्र, खाते होल्ड असल्याने अनुदानाची जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. याबाबत शासनस्तरावरून निर्णय व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

हेही वाचा: Corona Vaccination: उस्मानाबाद जिल्ह्यात आज गरोदर मातांनाचेही लसीकरण

आम्ही ठिबक सिंचनासाठी अर्ज केला आहे. मात्र, आमचे कर्जमाफीचे खाते होल्ड असल्याने अनुदानाची मागणीच केलेली नाही. तुमच्या खात्यावर रक्कम जमा होताच, तुमचे होल्डवर असलेले खाते सुरू होईल, असे बँकेचे अधिकारी शाखेत गेल्यानंतर सांगतात. त्यामुळे मोठी आर्थिक कोंडी होत आहे. शासनाने बँकांना आदेश काढून असा प्रकार थांबवावा.
- विशाल घोगरे, एकुरका, ता. कळंब.

खाते होल्ड करण्याचा प्रकार होत असेल तर त्यावर तत्काळ शासनाकडून रक्कम मागविता येऊ शकते. ज्यांची खाती अशा प्रकारे होल्ड असतील त्यांनी कळवावे, याबाबत योग्य कारवाई करता येईल.
- विकास देशमुख, जिल्हा उपनिबंधक, उस्मानाबाद.

loading image