शेतीत राबणाऱ्या सालगड्यावर दोन कोटीचे कर्ज..!

पाथ्रीत पती पत्नीला पोस्टाने नोटीस : आठ वर्ष शेतात राबवून केली सालदारकी
शेतीत राबणाऱ्या सालगड्यावर दोन कोटीचे कर्ज..!

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथे आदर्श समूहाचे अंबादास मानकापे यांची सुमारे दोनशे एकर जमीन आहे. या शेतात सालगडी म्हणून २०१३ ते २०२१ या कालावधीत राबणारे विष्णू हसराम बनसोड व त्याची पत्नी योगिता विष्णू बनसोड या दोघावर तब्बल दोन कोटी रुपयाचे कर्ज परस्पर उचलल्याची नोटीस पोस्टाने सालगड्याला मिळाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

एक एकर जमिनीच्या भरवशावर न घेतलेले दोन कोटींचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बनसोड कुटुंब वावरत आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये आदर्श समूहाची मोठी मालमत्ता असून पाल फाटा परिसरात सुमारे दोनशे एकर शेत जमीन आहे.

ही जमीन कसण्यासाठी तालुक्यातील पाथ्री येथील विष्णू हसराम बनसोड व योगिता विष्णू बनसोड हे दोन्ही पती-पत्नी सालगडी म्हणून काम करीत होते. विष्णू बनसोड व योगिता बनसोड यांना 80 हजार रुपये वार्षिक साल मानकापे कुटुंबीयांकडून दिले जात होते.

ग्रामीण भागामध्ये सातत्याने पावसाचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात राहत असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे घरची हालाखीची परिस्थिती असल्याने विष्णू आसाराम बनसोड व योगिता विष्णू बनसोड या पती-पत्नीने आदर्श समूहाचे अंबादास मानकापे यांच्या शेत जमिनीत सलगडी म्हणून राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह भागत होता. वर्षाला 80 हजार रुपये बनसोड कुटुंबीयांना दिले जात होते. सदरील शेतात काम करीत असताना तुमची आरोग्य विम्याची पॉलिसी काढायची आहे म्हणून अंबादास मानकापे यांचा मुलगा सुनील मानकापे यांनी कागदपत्रे घेतली.

तसेच वारसदार म्हणून विष्णू बनसोड यांची पत्नी योगिता बनसोड यांचेही कागदपत्रे घेतले. मात्र कोणत्याही प्रकारचे आरोग्य विम्याची पॉलिसी काढली नसून विष्णू हसराम बनसोड व योगिता विष्णू बनसोड या पती-पत्नीच्या नावे अनुक्रमें एक - एक कोटीचे कर्ज असे दोघांचे मिळून तब्बल दोन कोटीची नोटीस बँक प्रशासनाने पोस्टाद्वारे पाठवल्याने या सालगड्याच्या पायाखालची जमीन सरकली.

दोन वर्षांपूर्वी विष्णू बनसोड व योगिता बनसोडे यांनी सालगड्याचे काम सोडले होते. मात्र अचानक पोस्टाने आलेल्या नोटिसीमुळे बनसोड कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका एकरात उपजीविका भागविणाऱ्या कुटुंबियांना न घेतलेले दोन कोटींचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेने संपूर्ण कुटुंब सध्या तणावात आहे.

सालगड्यालाही सोडले नाही

फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील विष्णू हसराम बनसोड व योगिता विष्णू बनसोडे हे पती-पत्नी आदर्श समूहाच्या अंबादास मानकापे यांच्या पाल फाटा येथील शेत जमिनीत सालगडी म्हणून काम करायचे. आदर्श समूहात झालेल्या कोट्यावधीच्या घोटाळ्यातील अनेक प्रकरणे समोर येत आहे. यात सालगड्यालाही सोडले नसून त्याच्यावरही दोन कोटीचे कर्ज परस्पर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

पाल फाटा परिसरातील मानकापे यांच्या शेतात तब्बल आठ वर्ष सालदार म्हणून काम केले आहे. तुमची विम्याची पॉलिसी काढायची आहे असे म्हणून सुनील मानकापे यांनी कागदपत्र मागितले. जोपर्यंत तुम्ही आमच्याकडे सालगडी म्हणून आहे तोपर्यंत पॉलिसीचे हप्ते आम्हीच भरणार असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही कागदपत्र दिले. मात्र काल पोस्टाने मिळालेल्या दोन कोटीच्या नोटीसमुळे आमचे संपूर्ण कुटुंब तणावात आहे. आम्ही एक रुपयाही कर्ज घेतले नसून हे कर्ज परस्पर काढण्यात आले आहे.

- विष्णू हसराम बनसोड, पाथ्री (पासपोर्ट फोटो)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com