लॉकडाऊन : दुकान फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

file photo
file photo

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. दुकाने बंद करून दुकानदारांसह नागरिक आपल्या घरात थांबले आहेत. याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन वजिराबाद परिसरातील एक दुकान फोडले. दुकानातील नगदी व किंमती सामान असा एक लाख ६१ हजार ५०० रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना ता. दोन एप्रिलच्या रात्री हनुमान टेकडी भागात घडली. 

सध्या कोरोना व्हायरसच्या भितीमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक घराबाहेर पडत नाहीत. शहरातील सर्व आस्थापना बंद असून काही अत्यावश्‍यक सेवेतील दुकानेच सुरू आहेत. बंद दुकानावर मात्र चोरट्यांची नजर आहे. असाच प्रकार वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत ता. दोन एप्रीलच्या रात्री घडला. हा चोरीचा प्रकार ता. तीन एप्रील रोजी सकाळी उघडकीस आला. दुकानमालक इम्राण विराणी यांनी जावूनपाहिले तर त्यांच्या दुकानाचे कुलुप तसेच ठेवून खिडकीची ग्रील काढून चोरट्यांनी दुकानात प्रलवेश केल्याचे समजले. दुकानाच्या गल्ल्यातील नगदी व किंमती सामान असा एक लाख ६१ हजार ५०० रुपयाचा ऐवज लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

त्यानंतर त्यांनी वजिराबाद पोलिसांना दुकान फोडीची माहिती दिली. यावरून पोलिस निरीक्षक संदीप शिवले व सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पोलिसांच्या श्‍वान पथकालाही पाचारण करण्‍यात आले. इम्राण एकबाल विराणी यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मरे करत आहेत. 

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रमोट करावे

नांदेड : कोरोना विषाणूमुळे भारत सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. ता. १५ एप्रिलनंतरची ही परिस्थिती अनिश्चित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याचा निर्णय घ्यावा असे निवेदन उच्च शिक्षण मंत्री यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी पाठवले आहे.

मार्च- एप्रिल परीक्षेचे महिने म्हणून ओळखले जातात. परंतु या प्रसंगामुळे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी आपापल्या गावी रवाना झाले आहेत. तसेच सर्व बंदमुळे महाविद्यालय, सर्व शासकीय व खाजगी अभ्यासिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडचणी येत आहेत. 
परीक्षा कधी होणार की नाही ? आमचं पुढचं शैक्षणिक भवितव्य काय ? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत आहेत.

जनहिताच्या व विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून

याबाबतचा निर्णय तातडीने होणे अपेक्षित आहे. एप्रिलनंतर परीक्षा घ्यायच्या म्हटले तर सर्व यंत्रणेवर ताण येणार आहे. ही परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला साधारण दोन अडीच महिन्याचा कालावधी लागतो. अगोदरच परीक्षा लांबल्यामुळे आणि त्या परत घेण्याचा निर्णय झाला, तर आगामी वर्षासाठी शैक्षणिक वेळापत्रक संपूर्णपणे विस्कळीत होणार आहे. म्हणून या वर्षी राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन जनहिताच्या व विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे ओझे कमी करावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com