लॉकडाऊन : नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाने केले 170 कोटीचे उद्दिष्ट पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

नांदेडच्या प्रादेशिक परिवहन विभागाने २०१९ - २० साठी महसूल विभागाने घालून दिलेल्या उदिष्ट्यपूर्तीकडे कूच केली आहे. त्यासाठी त्यांनी वर्षभरापासूनच विविध करवसूलीच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साधण्याचा प्रयत्न केला आहे. 

नांदेड : प्रादेशिक परिवहन नांदेड विभागासाठी सन २०१९-२० साठी महसूल वसुलीसाठी १८० कोटी ३२ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. नांदेडच्या प्रादेशिक परिवहन विभागाने ३१ मार्च अखेर पर्यत १७० कोटी ७८ लाख रुपयांचे महसूल वसूलीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून त्याची सरासरी टक्केवारी ९४. ७१ इतकी झाली आहे.

कोरोनाचा व्हायरस जगभरात वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. भारतामध्ये कोरोनाचा फौलाव होऊनये व महामारी पसरुनये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून (ता.२२ मार्च २०२०) मध्यरात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, रेल्वे, विमान, बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात करोडोचे रुपयाचे नुकसार सुरु आहे. मात्र अशा परिस्थितीपूर्वीत नांदेडच्या प्रादेशिक परिवहन विभागाने चांगली कामगिरी केली आहे. 

हेही वाचा- सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिबा फुले

मोटार वाहन करापोटी दोन कोटीपेक्षा जास्त वसूली
या विभागातील वायुवेग पथकामार्फत २०१९ - २० मध्ये ३२ हजार २४९ वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या वाहनधारकाकडून दंड व तडजोड शुल्क म्हणून पाच कोटी ६१ लाख ९४ हजार रुपये व मोटार वाहन करापोटी दोन कोटी ७७ लाख २२ हजार रुपये तपासणीच्या माध्यमातुन वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचलेच पाहिजे- हिंगोलीत सव्वा लाखाचा गुटखा जप्त

पर्यावरण करातून दोन कोटी ४३ लाखाची वसूली
या विभागातील सीमा तपासणी नाका बिलोली येथे २०१९ - २० मध्ये ७६ हजार ७१५ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्या ठिकाणी दोषी आढळलेल्या वाहनधारकाकडून दंड व तडजोड शुल्क म्हणून ६९ लाख ७२ हजार रुपये, मोटार वाहनकर ७९ लाख ७४ हजार रुपये व पर्यावरण कर म्हणून दोन कोटी ४३ लाख रुपये वसूल करण्यात आला आहे.

या विभागातील सीमा तपासणी नाका देगलूर येथे २०१९-२० मध्ये ५६ हजार ४३२ वाहनाची तपासणी करण्यात आली असून, त्या ठिकाणी दोषी आढळलेल्या वाहनधारकाकडून दंड व तडजोड शुल्क ५२ लाख ५४ हजार रुपये, मोटार वाहन कर २८ लाख ४७ हजार रुपये व पर्यावरण कर एक कोटी २७ लाख रुपये वसूल करण्यात आला असल्याची माहिती नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: Nanded Regional Transport Department Fulfills Its Target Of Rs 170 Crore Nanded News