esakal | लॉकडाउन : जिल्हाधिकाऱ्यांची पाठीवर थाप- निलेश सांगडे 

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेडपासून जवळच असलेल्या आमदूरा व पूणेगाव परिसरातून सव्वातीन लाखाचा मुद्देमाल जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लॉकडाउन : जिल्हाधिकाऱ्यांची पाठीवर थाप- निलेश सांगडे 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्य उत्पादन शुल्कने आपल्या भरारी व विशेष पथकाद्वारे जिल्हाभरात अवैध देशी, हातभट्टी, सिंदी, ताडी, विदेशी व पराराज्यातील मद्य विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी (ता. १३) केलेल्या कारवाईत सात जणांना अटक करुन त्यांच्याकडून देशी, हातभट्टी, रसायनसह दुचाकी असा तीन लाख २७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. दरम्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक करण्यात आले. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशाभरासह जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. मात्र या संचारबंदीचे आदेश धुडकावत काही अवैध दारु विक्री करणारे मात्र मोकाट आपला अवैध धंदा करत आहेत. अशा धंद्यावाल्यांविरुद्ध कडक कारवाई व्हावी यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांनी आपल्या भरारी पथकंंसह अन्य यंत्रणेला सतर्क केले. कुठल्याही परिस्थीतीत अवैध दारु मिळणार नाही याची खबरदारी घेतली असून अशा चोरीच्या मार्गाने विकणाऱ्यांवर करडी नजर ठेवून आहेत. 

हेही वाचाVideo : सामना भीतीचा, डॉ. मुलमुले यांचे अनुभवकथन त्यांच्याच शब्दात

कारवाईमध्ये पथकानी सव्वातीन लाखाचा मुद्देमाल जप्त 

सोमवारी (ता. १३)  केलेल्या कारवाईमध्ये पथकानी सव्वातीन लाखाचा मुद्देमाल जप्त करून सात जणांना अटक केली. विशेष मोहिमेअंतर्गत मुदखेड तालुक्यातील आमदूरा ते पूणेगाव रस्त्यावर सापळा लावून केलेल्या कारवाईत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावेळी पथकाला सात आरोपी सापडले. या कारवाईत १६७ लीटर हातभट्टी दारुसह देशी दारु व सहा दुचाकी असा तीन लाख २७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

यांनी घेतले परिश्रम 

सदर कार्यवाही मध्ये निरीक्षक एस. एस. खंडेराय, दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार, मोहम्मद रफी, व्ही. टी. खिल्लारे, जवान श्री. इंगोले, श्री. नांदुसेकर, श्री. नागमवाड, श्री.संगेवार, श्री. भोकरे आणि राठोड यांचा समावेश होता.

येथे क्लिक करानांदेडची अभिनव चित्रशाळा आहे लय भारी, कशी? ते वाचाच

जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्याकडून प्रशस्तीपत्र

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अवैध दारु विक्रीविरुद्ध धडक मोहीम राबवून कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची काळजी घेतली. तसेच जिल्हाभरात अशा धंद्याविरूद्ध कारवाई करुन लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. तसेच शासनाचा महुसल वाढविला. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कौतूक करुन त्यांना प्रोत्साहान मिळावे म्हणून प्रशस्तीपत्र दिले. यावेळी निलेश सांगडे यांनी सांगितले की काम करत राहायचे. वरिष्ठांचे आपल्या कामावर लक्ष असते ते यावरुन दिसून येते.