esakal | लॉकडाऊन : वाहतुक पोलिसांच्या हाती पावतीबुकऐवजी लाठी
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

. विशेष म्हणतजे नेहमी शहरातील वाहतुक सुरळीत करणाऱ्या वाहतुक पोलिसांच्या हातात आता पावतीबुकाऐवजी लाठी दिसत आहे. आणि या लाठीचा प्रसाद अनेकजणांना देण्यात येत आहे. 

लॉकडाऊन : वाहतुक पोलिसांच्या हाती पावतीबुकऐवजी लाठी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना हा जीवघेणा आजार रोखण्यासाठी संबंध देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्या संदर्भाने नांदेड शहरातही लॉकडाऊन करण्यात आले असून उपलब्ध पोलिस बळाचा वापर करुन शहर व जिल्ह्यात नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणतजे नेहमी शहरातील वाहतुक सुरळीत करणाऱ्या वाहतुक पोलिसांच्या हातात आता पावतीबुकाऐवजी लाठी दिसत आहे. आणि या लाठीचा प्रसाद अनेकजणांना देण्यात येत आहे. 

नांदेड शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र काही अत्यावश्‍यक सेवा यातून बगळल्या असल्याने रस्त्यावर वाहतुक काही प्रमाणात सुरुच आहे. कामाशिवाय रस्त्यावरुन फिरणाऱ्यांना पोलिसांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. पोलिस बळ कमी पडत असल्याने आता चक्क वाहतुक पोलिसांच्याही हातात लाठी देण्यात आली आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी वाहतुक पोलिसांच्या लाठीचा प्रसाद गुडीपाडव्यानिमित्त अनेकांना मिळाला. त्यानंतर मात्र काही काळ या रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळाला. 

तोंडाला मास्क लावण्याची विनंती करीत होते

शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी आपल्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाईसोबतच रिकामटेकड्यांना काठीचा धाक दाखवत घरी पाठविले.तसेच तोंडाला मास्क लावण्याची विनंती करीत होते. नागरिकांना कितीही समजावून सांगितले तरी लोक कुठलेतरी काम काढून घराबाहेर पडत आहेत. नांदेडकरांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.   
हेही वाचाखाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन,  निराधार व्यक्तींना दिले जातेय अन्न ​


जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून आढावा

नांदेड : ‘कोरोना’ विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भाग ‘लॉकडाऊन’ आहे. नागरीकांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या आरोग्य संस्थांचा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पद्मा सतपलवार यांनी मोघाळी (ता. भोकर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून आढावा घेतला. सभापती संजय बेळगे यांनी लोहगाव (ता. बिलोली) प्राथमिक आरोग्य केंद्रतील रुग्णांची चौकशी करत आरोग्य सुविधांची माहिती घेतली. त्याचबरोबर सभापती बाळासाहेब रावणगावकर, सभापती ॲड. रामराव नाईक, सभापती सुशीला बेटमोगरेकर यांनी जिल्हा परिषद सर्कलमधील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरीकांनी खबरदारीच्य उपाय योजनांचे पालन करून घरीच राहण्याचे आहवान त्यांनी केले.