लॉकडाऊन : अशी बहरली दापशेडची नैसर्गिक शेती

शिवचरण वावळे
सोमवार, 30 मार्च 2020

गावाचे पाण्याचे संकट टळले होते. तेव्हा पाण्याचा सदुपयोग झाला पाहिजे या हेतुने दापशेडचे गावकरी पुन्हा एकत्र आले आणि सुरु झाली ती ‘झिरो’ बजेट नैसर्गिक शेती. दरम्यान गावातील अनेकांच्या उरावर कर्जाचा बोजा होताच.

नांदेड : आजच्या चार वर्षापूर्वी जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील दापशेड गावास वर्षातील सहा महिने टॅंकरवर अवलंबून रहावे लागायचे. मात्र गावकऱ्यांनी दिवंगत रामराव टोणगे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ‘ग्रामविकास’ मार्फत लोकसहभागातून जलसंवर्धनाची साडेचार किलोमीटरपर्यंत नदीचे खोलीकरण केले. तेव्हा सर्व गाव पाणीदार झाले आणि पहिल्यांदाच गावाला ‘वसुंधरा’ मित्र पुरस्कार मिळाला. 

आता गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले होते. गावाचे पाण्याचे संकट टळले होते. तेव्हा पाण्याचा सदुपयोग झाला पाहिजे या हेतुने दापशेडचे गावकरी पुन्हा एकत्र आले आणि सुरु झाली ती ‘झिरो’ बजेट नैसर्गिक शेती. दरम्यान गावातील अनेकांच्या उरावर कर्जाचा बोजा होताच. ही बाब ग्रामविकासचे ॲड. उदय संगारेड्डीकर यांना कानावर आल्याने संगारेड्डीकर यांनी गावाला कर्जमुक्तीच्या खाईतुन बाहेर काढण्यासाठी गावातील अनेक शेतकऱ्यांना स्वखर्चाने पाळेकर गुरुजींच्या नैसर्गिक शेती शिबिरास पाठविले. आणि गावातील शेतकरी विश्र्वनाथ होळगे यांनी संपूर्ण शेतीच नैसर्गिक पद्धतीने करण्यास सुरुवात केली. 

हेही वाचा- मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करा ः कुलगुरू

शेतकऱ्यांच्या मालकीचे विक्री केंद्र
कुठलेही रासायनिक खत व औषधी वापरत नाहीत. नैसर्गिक खत व नैसर्गिक औषधी स्वतःच शेतात तयार करतात. पहिल्या वर्षी उत्पनात कुठलीही घट झाली नाही. दुसऱ्या वर्षीपासून उत्पन्न वाढतच गेलं. ग्राहकांना रास्त भावात वर्षभर नैसर्गिक विषमुक्त भाजीपाला मिळावा यासाठी मागील अडीच वर्षांपूर्वी चिखलवाडी कॉर्नर येथे तसेच स्वानंद स्वदेशी भांडार कॅनॉल रोड, अष्टविनायक नगर येथे शेतकऱ्यांच्या मालकीचे विक्री केंद्र सुरू केले. आज शेकडो डॉक्टर, वैज्ञानिक, व्यावसायिक या केंद्राचे कायमस्वरूपी ग्राहक झाले आहेत.

हेही वाचले पाहिजे- विनाकारण फिरु नका, वाहने जप्त करू : डॉ. विपिन

नैसर्गिक शेती  स्वतंत्र व्हॉटस्अप ग्रुप
नैसर्गिक शेतीच्या माध्यमातुन दापशेडच्या शेतकऱ्यांना भसघोस उत्पन्न मिळत आहे.भजीपाला विषमुक्त असल्याने त्यांना कधीही माल फेकून देण्याची वेळ आली नाही. ग्राहकही वर्षभर एकाच रास्त दराने नैसर्गिक भाजी मिळत असल्याने वेगळे समाधान मिळत आहे. दापशेडच्या नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हॉटस्अप ग्रुप तयार करुन त्या माध्यमातून अनेक ग्राहक जोडले आहेत. उदय संगारेड्डीकर, दिपक मोरताळे, राजेंद्र देवणीकर, निलेश आगळे हे वेळ पडेल तेव्हा शेतकऱ्यांच्या सर्वप्रकारच्या मदतीस धावून जातात. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देत असतात. मागील चार वर्षापासून शहरी भागातील विचारवंत व ग्रामीण भागातील शेतकरी एकत्र आल्यास चांगले घडु शकते हे सिद्ध झाले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: Such Is The Natural Cultivation Of Dapashed Nanded News