esakal | लाॅकडाऊनमध्ये ही नशेबाजांचा नागरिकांना त्रास पोलिसांना लक्ष घालण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

डी मार्ट परिसर, पूर्णारोड, मालेगाव रोड, शिवरोड, विमानतळ रोड, खंडोबा चौक अशा ठिकाणी मोकळ्या जागा मद्याच्या नशेत धुंद झालेल्या टारगटांची अड्डे बनली आहेत. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये एक प्रकारची दहशत पसरली आहे.

लाॅकडाऊनमध्ये ही नशेबाजांचा नागरिकांना त्रास पोलिसांना लक्ष घालण्याचे आवाहन

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : राष्ट्रीय आपत्तीशिवाय मद्यपानाची दुकाने ही राष्ट्रीय सन, उत्सव, महापुरुषांची जयंती निमित्ताने एखाद दोन दिवस; तिही पूर्व सूचना देऊन बंद ठेवली जातात. ‘कोरोना’मुळे देशात अनपेक्षित ‘लॉकडाउन’ची घोषणा झाली. परिणामी कुणालाही दारुची साठेबाजी करता आली नाही. ज्यांच्याकडे काही प्रमाणात दारुचा साठा होता, त्यांनी मात्र लॉकडाउनच्या काळात अव्वाच्या सव्वा भावाने मद्यविक्री करुन आपले उखळ पांढरे केले.

नांदेड शहराच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही दिशा नव्याने विस्तार होत आहेत. शहरास लागुन असलेल्या मोकळ्या जागा बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी करुन त्यावर प्लॉटींगचे नियोजन केले आहे. या मोकळ्या प्लॉटमध्ये डांबरी रस्ते, लाईट इत्यादी भौतिक सोयी सुविधा करुन ठेवल्या आहेत. परंतु अनेक वर्षापासून या प्लॉटची विक्री झाली नाही. त्यामुळे डी मार्ट परिसर, पूर्णारोड, मालेगाव रोड, शिवरोड, विमानतळ रोड, खंडोबा चौक अशा ठिकाणी मोकळ्या जागा मद्याच्या नशेत धुंद झालेल्या टारगटांची अड्डे बनली आहेत. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये एक प्रकारची दहशत पसरली आहे.
 
हेही वाचा- Video : नांदेडच्या विद्याश्रीने घेतली लहान वयातच भरारी, कशी? ते वाचाच
नागरीकांनी झाडतोडुन रस्त्यावर टाकले

जैनमंदिराकडून खंडोबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मद्यपी आढळून येत आहेत. पोलिसांना सांगुन देखील फरक पडला नसल्याने मंगळवारी (ता.२८) रात्री दहाच्या सुमारास परिसरातील काही नागरिकांनी एकत्र येत रस्त्याच्या कडेला असलेले भले मोठे बाभळीचे झाड तोडुन रस्त्यावर आडवे टाकुन रस्ता कायमचा बंद केला आहे.
 
दारुची दुकाने बंद होऊन महिना संपला असला तरी, दारुचा पुरवठा कोण आणि कसा करतोय याची संबंधित यंत्रणेला माहिती नसेल का? अशी नागरिकांतून विचारणा होत आहे. नांदेड जिल्ह्यात दारु बंदी असली तरी, शेजारच्या राज्यातून छुप्या पद्धतीने दारुची आयात होत असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे शहर परिसरातील रिकामे भुखंड हे मद्यपिंची अड्डे बनली आहेत.

हेही वाचा-  स्वारातीम विद्यापीठ देतय प्राध्यापकांना ऑनलाईन प्रशिक्षणातून धडे

मोकळे भुखंड बनलेले मद्यपींचे अड्डे 

सध्या लॉकडाउन असल्याने कुणालाही घराबाहेर पडण्याची मुभा नाही. तरी देखील काहीजण लॉकडाउनचा नियम तोडुन केवळ मजा म्हणून घराबाहेर पडत आहेत. मिळेल तेथून बेभावाने वाईन खरेदी करत आहेत. काही मिळाले नाही तर गांजा, व्हाईटनर इतकेच नव्हे तर नव्याने बाराजात आलेले ७० टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरची खरेदी करुन त्याची देखील नशा करताना दिसून येत आहेत. मद्यपींचे अड्डे बनलेले हे मोकळे भुखंड शहरातील विविध सोसायट्यांना लागुन आहेत. यामुळे तेथील रहिवाशांना देखील या मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे.

पोलिसांनी या भागात गस्त घालावी
शिवरोड, खंडोबा चौक परिसरात नवीन प्लाॅटींग पडली असून संबंधितांनी या ठिकाणी चकाचक डांबरीरस्ते व लाईटपोलची सुविधा करुन ठेवली आहे. त्यामुळे मोकळ्या रस्त्यावर टोळके रात्री उशिरापर्यंत बसत आहेत. त्यांच्या भितीने आम्हांला रात्री उशिरापर्यंत जाग्रण करावे लागत आहे. मद्यपींच्या बसण्यामुळे चोरी होण्याची भिती वाटत आहे. भाग्यनगर पोलिसांनी या भागात गस्त घालावी.
- ॲड. विठ्ठल शेळके