लॉकडाउनमध्ये जंगलातील पाणवठे कोरडेच...कुठे वाचा

hingoli photo
hingoli photo
Updated on

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : औंढा तालुका डोंगराळ भागात असून येथे जंगलक्षेत्र बऱ्यापैकी आहे. या भागामध्ये वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये निलगाय रोही, हरण, मोर, वानर असे अनेक प्रकारचे वन्यप्राणी जंगलामध्ये आहेत. परंतु, जंगलामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळे हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधात धाव घेत आहेत.

औंढा तालुक्यातील बहुतांश भाग हा जंगल क्षेत्रात मोडतो. औंढा परिसरातही वन विभागाने वृक्षलागवड केल्याने हा परिसर हिरवळीने नटलेला असतो. पावसाळा, हिवाळ्यात तर हा परिसर पाहण्यासारखा असतो. त्यामुळे वन्य प्राण्यांची संख्याही या भागात जास्त आहे. पावसाळा, हिवाळ्यात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी बऱ्यापैकी उपलब्ध असते. 

पाणवठ्यांचा वन्य प्राण्यांना फायदा

मात्र, उन्हाळ्याची चाहुल लागताच वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. वन्य प्राण्यांची भटकंती थांबावी यासाठी वनविभगागाने ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांचा वन्य प्राण्यांना फायदा होतो. तसेच मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, सध्या या पाणवठ्यात पाणीच उपलब्ध नसल्याने पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. 

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

त्यामुळे वन्य प्राण्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. हरीण, मोर, वानरे मानवी वस्‍तीत पाण्यासाठी धाव घेत आहेत. शेतशिवारातीलदेखील आता पाणी कमी झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्‍था आहे ते शेतकरी सिमेंटच्या हौदात पाणी टाकून ठेवतात.

 मानवी वस्तीकडे धाव

 मात्र, अनेकांच्या विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी खालावल्याने सिमेंटचे हौदही कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट असल्यामुळे जनता हैराण आहे, तर याच संकटामुळे वन्य प्राण्यांचे पाणवठे पाण्याने भरले जात नसल्याने हे प्राणीही सैरावैरा धावताना दिसत आहेत. 

वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार

माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा वन्यप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू असून लोक घरात; तर वन्यप्राणी गावात मुक्तसंचार करताना दिसून येत आहेत. तसेच निलगाई, रोही, हरणांचे कळपही भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.

स्‍वखर्चातून पाणी टाकण्याचे काम सुरू

औंढा नागनाथ तालुक्‍यात असलेल्या जंगलात पंधरा ते सोळा पाणवठे आहेत. सध्या उन्हाळा असल्याने टँकरने स्‍वखर्चातून पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी शासनाकडून कोणताही निधी मिळत नाही. जवळच सिद्धेश्वर धरण असल्याने वन्य प्राण्यांची पाण्याची व्यवस्‍थादेखील होते. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या पाण्याची व्यवस्‍था कशी होईल, याची काळजी वन विभागाकडून घेतली जाते.
- माधव केंद्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी, औंढा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Marathi News Esakal
www.esakal.com