esakal | नांदेडला गल्लीबोळातील रस्तेही लॉकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

कोरोनासारखा गंभीर आजार पसरु नये म्हणून देश, राज्य, जिल्हा आणि गावच्याही सीमा आता बंद करण्यात आल्या आहेत. तरी देखील काही नागरीक ऐकत नाहीत. त्यातून मार्ग काढत असल्यामुळे शेवटी त्या त्या भागातील नागरीकांनीच पुढाकार घेऊन आपआपल्या घराच्या आजूबाजुंचे रस्ते बंद करण्यास सुरुवात केली आहे.

नांदेडला गल्लीबोळातील रस्तेही लॉकडाऊन

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोनापासून बचाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ता. २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. सुरुवातीला लॉकडाऊन हा प्रकार जनतेसाठी नवीन वाटत असला तरी, देशात जसजसा कोरोना व्हायरस पाय पसरत आहे. त्यामुळे लोकांना देखील कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे महत्व पटू लागले आहे.

ज्यांना कोरोना व्हायरसची गंभीर परिणामाची चिंता वाटत आहे, त्या सर्वांनी ता. २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर न पडणे यातच शहाणपणा समजून परिवाराच्या सुरक्षेसाठी स्वतःला घरातच लॉकडाऊन करुन घेतले आहे. मात्र अजूनही काही नांदेडकरांना ‘कोरोना’च्या आजाराबद्दल गंभीरता वाटत नाही. त्यामुळे असे नागरीक ना कोरोना, ना पोलीसांचा आदेश मानत आहेत. एवढेच नव्हे तर लॉकडाऊन झुगारुन घराबाहेर पडून स्वतःसोबत परिवाराचा जीव देखील धोक्यात आणू पाहत आहेत आणि यातच त्यांना मोठेपणा वाटत आहे.

हेही वाचा- नशा व सेक्स वाढविण्याची बनावट औषधी जप्त

शहरातील मुख्य रस्ते बंद
नांदेड शहरात दररोज विनाकारण होणारी रस्त्यावरील गर्दी थांबविण्यासाठी गजानन मंदीर (मालेगाव रोड), पूर्णा निळा मार्ग, छत्रपती चौक, आसना पुल, (विमानतळ रोड), चैतन्यनगर शिवरोड, तरोडा नाका, राज कॉर्नर, वर्कशॉप, आनंदनगर, महात्मा फुले चौक, शिवाजीनगर, आण्णा भाऊ साठे चौक, गुरुद्वारा चौरस्ता, जुना मोंढा, नवा मोंढा, बर्की चौक, गोवर्धन घाट पुल, देगलुर नाका, वजिराबाद चौरस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रेल्वे स्थानक, बसस्थानक, डॉक्टर लाईन अशा शहरातील बहुतेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. बंद केलेल्या रस्तावर पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. इतका बंदोबस्त असताना देखील काही हौसी नांदेडकर घराबाहेर पडत आहेत.

हेही वाचले पाहिजे- जिल्ह्यात १८१ जण विदेशातून परतले

नागरिकांनी केले लहान रस्ते बंद
नागरिकांना रोखताना पोलीसांची होणारी दमछाक बघता आता शहरातील राज कॉर्नर, तरोडा नाका, छत्रपती चौक, भावसार चौक, सरपंचनगर, चैतन्यनगर, आनंदनगर, वसंतनगर, नवा मोंढा, शारदानगर अशा गल्ली बोळातील लहान सहान रस्ते देखील त्या ठिकाणच्या सुज्ञ नागरीकांनी आपापल्या परीने बंद करुन रिकामटेकड्यांना पुन्हा ‘लॉकडाऊन’ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तरी देखील नागरीक या ना त्या गल्ली बोळातून मार्ग काढण्यासाठी धडपड करत शेवटी शहरातील मुख्य रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसून येत आहेत.

 
loading image
go to top