esakal | हिंगोलीत राष्ट्रीय विराट लोकमंचकडून टाळेबंदीच्या आदेशाची होळी

बोलून बातमी शोधा

हिंगोली आदेशाची होळी
हिंगोलीत राष्ट्रीय विराट लोकमंचकडून टाळेबंदीच्या आदेशाची होळी
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्हाधिकारी यांनी पुन्हा पंधरा दिवसाची टाळेबंदी वाढविली असल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत, त्यामुळे लागू केलेला लॉकडाऊन मागे घेण्यासाठी शनिवारी (ता. एक) येथील गांधी चौकात राष्ट्रीय विराट लोकमंचच्या वतीने आदेशाची होळी करुन निषेध करण्यात आला.

याबाबत शेख नईम शेख लाल यांनी शनिवारी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती समाधानकारक असून, आघाडी सरकारची बदनामी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी यांनी अमानुषपणे लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे, तो परत घेण्याचा सूचना देण्यात याव्यात. कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे. आज निगेटिव्ह आलेल्या व्यक्ती उद्या पॉझिटिव्ह येऊ शकतो, मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का असा आरोप केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील स्पस्ट केले की, कोरोना बरोबर जगावे लागेल, एक वर्षापासून लहान व्यवसाय बंद पडले असताना त्यांनी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावायचा असेल तर हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळेस जेवणाची सोय करा तरच टाळेबंदी लागू करा असे नमूद केले आहे.

हेही वाचा - भोकर तालुक्यात बालविवाह रोखला; जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व भोकर प्रशासनाची तत्परता

यावेळी लॉकडाऊन परत घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय विराट लोकमंच तर्फे गांधी चौकात जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची होळी करून निषेध करण्यात आला. यावेळी शेख नईम शेख लाल, तौफिक अहमद खान, शेख नौमान नविद नईम, शेख नफिस पहेलवान, तौफिक बागवान, मोहमद तुफेल, मोहमद शकील, मोहमद अमेर अली, परवेज पठाण आदी सहभागी झाले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे