

Youth murdered over open space dispute in Khambegaon of Loha taluka
Sakal
लोहा : गावठाणातील मोकळ्या जागेच्या वादातून झालेल्या बाचाबाचीत मालवाहू टेम्पो अंगावर घालून एका ४६ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी (ता. १) दुपारी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास खांबेगाव (ता. लोहा) येथील बसस्थानक परिसरात घडली. अरुण भाऊराव कुंटे (वय ४६, रा. खांबेगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी लोहा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.