

Amol Birajdar BJP Entry Talks Create Political Stir in Lohara Basavaraj Patil Statement Ahead of Nagar Panchayat Poll
esakal
नीलकंठ कांबळे
लोहारा (जि. धाराशिव) : लोहारा नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची चाहूल लागताच तालुक्यातील राजकारणाला वेग आला आहे. धाराशिव-लातूर-बीड विधान परिषदेचे नवनिर्वाचित भाजप आमदार बसवराज पाटील यांच्या एका सार्वजनिक वक्तव्यामुळे आता तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन करताना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचाही उल्लेख केल्याची चर्चा रंगत असून, या एका वक्तव्याने आगामी निवडणुकीच्या राजकारणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.