Phulambri News : गणोरी येथे महिला मतदारांचा मेळावा; रंगतदार पथनाट्याद्वारे विद्यार्थिनींनी केले मतदारांचे प्रबोधन

फुलंब्री तालुक्यात 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, महिलांची मतांची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषद प्रशाला गणोरी येथे महिलांचा मेळावा घेऊन गुरुवारी (ता.२५) रोजी जनजागृती करण्यात आली.
lok sabha election voting awareness among women at ganori phulambri
lok sabha election voting awareness among women at ganori phulambri Sakal

फलंब्री : फुलंब्री तालुक्यात 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, महिलांची मतांची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषद प्रशाला गणोरी येथे महिलांचा मेळावा घेऊन गुरुवारी (ता.२५) रोजी जनजागृती करण्यात आली.

यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्य सादर करून उपस्थितांना प्रोत्साहित केले. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका उत्कर्षा देशमुख यांनी इथिकल वोटिंग बाबतीत विद्यार्थ्यांच्या मदतीने सुंदर प्रबोधन केले. स्वीप कक्षाचे सहाय्यक जगन ढोके यांनी जनजागृती गीत गायन करून उपस्थितांना मतदानासाठी उद्युक्त केले.

देविदास तुपे यांनी नारी शक्तीचे गुणगान कवितेतून व्यक्त केले. शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले तर गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्षप्रमुख क्रांती धसवाडीकर यांनी महिलांनी मतदानाच्या या महान कार्यात आपले भरभरून योगदान द्यावे आणि महिलांनी लोकशाहीच्या या उत्सवात एखादा सण जसा साजरा केला जातो तसे सजून धजुन सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी महिलांनी मी महिला मतदार, मतदान नक्की करणार..!

अशा घोषणा देऊन मतदान नक्की करणार असा निर्धार व्यक्त केला. मतदार शपथेचे वाचन मिरा हातकंगणे यांनी केले. यावेळी जवळपास 100 महिलांची उपस्थिती होती. या महिला मेळाव्याचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल देशमुख यांनी केले.तर बीएलओ कचरू पेहरकर, सचिन महाजन यांचे सहकार्य मिळाले.

बहारदार सूत्रसंचालन कू कावेरी सावंत या सहावीच्या विद्यार्थिनीने केले. "मी महिला मतदार मतदान करणार" अशा प्रकारचा निर्धार व्यक्त करणाऱ्या या मेळाव्यास गणोरी येथील बचत गटाच्या प्रतिनिधी, महिला पालक, अंगणवाडी सेविका ,आशाताई, शिक्षीका यांची चांगली उपस्थिती होती.

पथनाट्यला यांचा पुढाकार

पथनाट्यात पायल सपकाळ, तनुजा पुसे, अनुष्का तांदळे, अनुष्का पेहेरकर, आदिती पेहेरकर, गायत्री पगारे, संजीवनी शेळके यांचा सहभाग होता. पथनाट्यास मार्गदर्शन एस डी देशमुख, एस डी नाईकवाडे, अरविंद राजहंस, नागराज परदेशी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com