Loksabha 2019 : अब्दुल सत्तार यांचे अजूनही तळ्यात-मळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

दलित-मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्यासाठी आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली आहे. ते काय निर्णय घेतात, यावर लक्ष लागले असून, त्यांनी माघार घेतली तर मी अपक्ष लढेन व अर्ज मागे नाही घेतला, तर विचार करावा लागेल, असे कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (ता. सहा) सांगितले. 

औरंगाबाद - दलित-मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्यासाठी आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली आहे. ते काय निर्णय घेतात, यावर लक्ष लागले असून, त्यांनी माघार घेतली तर मी अपक्ष लढेन व अर्ज मागे नाही घेतला, तर विचार करावा लागेल, असे कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (ता. सहा) सांगितले. 

बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केलेले कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार 8 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सत्तार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की शनिवारी कन्नड, खुलताबाद तालुक्‍यांचा दौरा करून समर्थकांच्या बैठका घेतल्या. निवडणूक लढावी, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे; मात्र दलित-मुस्लिम समाजातील मतांचे विभाजन होऊ नये याची दक्षता मी घेत आहे. उमेदवारी मागे घ्यायची की कायम ठेवायची, याचा निर्णय सोमवारी दुपारी तीन वाजेपूर्वी घेईन. भाजपमध्ये मी जाणार नाही, असे सत्तार यांनी नमूद केले. 

Web Title: loksabha 2019 Aurangabad Lok Sabha constituency abdul sattar confused