लोकसभेसाठी प्रा. बनसोड यांच्यासह तिघांची नावे

Congress
Congress

औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वच्छ चेहरा देण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. इच्छुकांच्या दिल्लीत पाठविलेल्या यादीत आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आणि प्रा. रवींद्र बनसोड यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कमिटीची बैठक बुधवारी (ता. ३०) मुंबईत झाली. त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लढविलेल्या २६ मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांची यादी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात आली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तब्बल १४ इच्छुकांनी आपली नावे दिली होती. यात जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जगन्नाथ काळे, प्रा. रवींद्र बनसोड यांच्यासह चौदा जणांचा समावेश होता. मात्र, मुंबईत झालेल्या प्रदेश कमिटीच्या बैठकीत औरंगाबाद लोकसभा इच्छुकांच्या यादीतून तीन नावे अंतिम मंजुरीसाठी निवडण्यात आली. त्यात स्वच्छ चेहरा व जिल्ह्यात जनसंपर्क असलेल्या प्रा. बनसोड यांच्यासह श्री. झांबड व डॉ. काळे यांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले.   

काँग्रेसची नावे, राष्ट्रवादीची तयारी 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सलग चार निवडणुकांपासून पराभूत होणाऱ्या काँग्रेसकडून ही जागा राष्ट्रवादीकडे घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे काँग्रेसने संभाव्य तीन उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीने औरंगाबादेतून लढण्यासाठी कंबर कसली आहे.

मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांना पक्षाने तयारीला लागा, असे आदेश दिल्यामुळे त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे.

सत्तार विधानसभेलाच! 
नुकत्याच झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये श्री. सत्तार यांचे नावदेखील अनेकांनी समोर केले होते. मात्र, आजच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने ते विधानसभा निवडणूकच लढविणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com