माजी सैनिकाच्या मुलाला लुटणारे संशयित अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

औरंगाबाद - सिडको बसस्थानकातून विद्यार्थी रिक्षात बसला.. तेव्हा साईबाबांची मूर्ती रिक्षाच्या हॅंडलसमोर त्याला दिसली. रिक्षा मध्यवर्ती बसस्थानकाकडे नेण्याऐवजी चालकाने त्रयस्त ठिकाणी नेऊन विद्यार्थ्याला चाकूच्या धाकावर लुबाडले; पण पोलिसांनी साईबाबांची मूर्ती असलेली रिक्षा शोधून संशयित चालक व त्याच्या साथीदाराला शनिवारी (ता. २१) अटक केली. लुबाडणुकीची घटना गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश प्रेमदास पवार (वय २०, रा. ढाकेफळ तांडा, ता. घनसावंगी, जि. जालना) असे चालकाचे, तर साथीदाराचे दीपक अरुण गायकवाड (२४, रा. बार्शीनाका, बीड) अशी नावे आहेत. ते सध्या शहरातील हनुमाननगर येथे राहतात. विकास भगवान चाटे (रा. मेव्हणा राजा, ता. देऊळगाव राजा) विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेतो. तो माजी सैनिकाचा मुलगा असून, नाशिकच्या एका कंपनीत मुलाखतीसाठी जात होता. देऊळगाव राजा येथून तो गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एसटी बसने निघून सिडको बसस्थानकात रात्री पावणेअकराच्या सुमारास पोचला. तेथून मध्यवर्ती बसस्थानकावर जाताना पवार याच्या रिक्षात तो बसला. त्यावेळी पवारचा साथीदार गायकवाड रिक्षातच होता. 

मध्यवर्ती बसस्थानकात जाण्याऐवजी चालकाने विकासला कैलासनगर येथील स्मशानभूमीतील मोकळ्या मैदानात नेले. तेथे पवार व गायकवाडने त्याला चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. यानंतर दोघांनी त्याचा मोबाईल, तीन हजार रुपये, शैक्षणिक कागदपत्रांसह बॅग हिसकावली. यानंतर विकासने जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. यानंतर पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, साईनाथ गीते, उपनिरीक्षक शेख रफीक, जमादार शेख हारुण, संपत राठोड, संजय गावंडे, गणेश नागरे, सुनील जाधव आणि बाळू थोरात यांनी केली.

असा घेतला शोध
गुन्हा नोंद झाल्यानंतर रिक्षाचा क्रमांकही विकासने पाहिलेला नव्हता; पण आत हॅंडलसमोर साईबाबांची मूर्ती आहे. दोघेही मराठी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ही रिक्षा हुडकून दोन्ही संशयितांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीतील साहित्य जप्त केले. 

Web Title: loot crime police