मदत मागण्याचा बहाना करून कारचालकाला लुटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

नांदेड : रस्त्याच्या कडेला एकाला विव्हळत ठेवून अनोळखी चोरट्यांनी मदतीचा हात मागत एका कारचालकाला लुटले. त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर चक्क त्याची कारसुध्दा पळवून नेली. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या जुना कौठा भागात रविवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास घडली.

शहरातील तारासिंह मार्केटमध्ये राहणारे दिपेशसिंह हजारी (वय ४०) हे रविवारी (ता. १८) रात्री आपल्या कारमधून (एसएच१२-जीव्ही-८११८) सिडकोला जुना कौठा मार्गे एकटेच जात होते. त्यांची कार यशोसाई हॉस्पीटलसमोर येताच रस्त्याच्या कडेला चोरांपैकी एकजण विव्हळत होता. तर अन्य तीघेजण मदत मिळावी म्हणून येणाऱ्या वाहनांना हात दाखवत होते. मदत करा म्हणून गयावया करीत होते. यावेळी दया आलेल्या दिपेशसिंह हजारी यांनी आपली कार बाजूला थांबविताच या चोरट्यांनी गाडीत प्रवेश केला. 

तोंड दाबून त्यांना बेदम मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी देऊन त्यांना गाडीतून ढकलून देऊन कार घेऊन पसार झाले. जखमी हजारी यांच्यावर यशोसाई रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी घटनास्थळाची पाहणी करून पोलिस उपनिरीक्षक गजानन मोरे यांनी जखमीची विचारपूस केली. अद्याप नांदेड ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. 
 
Web Title: Looted the crew by pretending to ask for help