अवकाळी पावसामुळे पिके धोक्यात, फळपिकांचे नुकसान

सुधीर कोरे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जेवळी (उस्मानाबाद) : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे तुगाव, येणेगूर, दाळिंब (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) परिसरात फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुगावमध्ये रस्ते, शेतीमध्ये गारांचा थर साचला होता. मंगळवारी (ता. 16) पहाटे पाचच्या सुमारास ही गारपीट झाली.

तुगाव परिसरात मंगळवारी पहाटे एकपासून वादळी वारे, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरवात झाली. पहाटे पाचपर्यंत कमी- अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. पाचच्या सुमारास गारपिटीला सुरवात झाली. अर्धातास जोरदार गारपिट सुरू होती. या गारपिटीमुळे पपई, दाळिंब या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुष्काळी परिस्थितीत जगविलेल्या या बागांना गारपिटीचा तडाखा बसला.

वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांखाली कैऱ्यांचा सडा पडला होता. काही झाडे उन्मळून पडली. कोवळ्या ऊसपिकालाही गारपिटीचा फटका बसला. गारांच्या मारामुळे झाडांवरील पालाही लगळून पडला. अर्धा तास जोरदार गारपिट झाल्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. तुगावमध्ये ठिकठिकाणी सकाळी नऊपर्यंत गारांचा थर साचला होता. जेवळी (ता. लोहारा) परिसरातही पहाटेच्या सुमारास काहीवेळ वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.  

Web Title: loss of crops due to irregular rain at osmanabad