चार जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नांदेड - मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना शनिवारी (ता.२६) वादळी वाऱ्यासह जोरदार माॅन्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. यामुळे बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड, परभणी, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांत ठिकठिकाणी विजेचे खांब व वृक्ष उन्मळून पडले. घरावरील पत्रे उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत.  

नांदेड जिल्ह्यात किनवट, हदगाव, हिमायतनगर, बिलोली, नायगाव, अर्धापूर तालुक्‍यांत अधिक पाऊस झाल्‍याने बागायती पिकांचे नुकसानही अधिक आहे. शिवाय अनेक घरांवरील पत्रे उडाले, झाडे उन्मळली आहेत. जिल्ह्यात सरासरी १२.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

परभणीसह गंगाखेड, पूर्णा, पालम तालुक्‍यांतही पावसाचा जोरदार तडाखा बसला. तब्बल दोन तास विजांचा तांडव सुरू होता. अनेक गावांत रात्रभर वीज नव्हती. ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. पांगरा (ता. पूर्णा) येथे पत्रा लागून बैल जखमी झाला आहे. 

हिंगोलीतील वसमत व कळमनुरी तालुक्‍यांत वादळासह गारांचा पाऊस झाल्याने केळी व आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाले. वसमत शहरासह तालुक्‍यात गिरगाव, हयातनगर येथे गारपीट झाल्याने केळीचे पीक आडवे झाले. महसूलतर्फे पिकांची पाहणी करण्यात आली. वाऱ्याने जागोजागी विजेच्या तारा तुटल्या. कळमनुरी शहरासह वारंगाफाटा, आखाडा बाळापूर, पोतरा या भागालाही पावसाने झोडपले.  

उस्मानाबाद जिल्ह्याला शनिवार आणि रविवारच्या वादळी पावसाने झोडपले. केसरजवळगा येथे वीज पडून एक म्हैस दगावली. अचलेर परिसरात घरांवरील पत्रे उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. पत्रा व दगड डोक्‍यात लागल्याने ललिता धनसिंग पवार (वय ३५) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. कोंबडवाडी (ता. उस्मानाबाद) येथे रविवारी (ता.२७) सायंकाळी वीज पडून संतराम मिसाळ यांच्या दोन गायी दगावल्या. आवाड शिरपुरा (ता. कळंब) व वाशीमध्येही हा पाऊस बरसला.

 नांदेड - अर्धापूर तालुक्‍यात केळी, आंब्यांचे नुकसान. 
 परभणी - चार तालुक्‍यांना तडाखा, दोन तास विजांचे तांडव.
 हिंगोली - जागोजागी वृक्ष उन्मळले, घरांचेही प्रचंड नुकसान.
 उस्मानाबाद - वीज पडून तीन जनावरे दगावली, महिला गंभीर. 

Web Title: loss by storm rain