‘भाषेवर जितके प्रेम अधिक असेल तितकी ती बहरते’

हरी तुगावकर
Tuesday, 6 October 2020

भाषेबद्दल आपल्याला खरोखर अभिमान असतो का? की आपल्याला भाषेचा पुळका आलेला असतो ही बाब आत्मचिंतन करण्यासारखी आहे’’, असे मत लेखिका माधुरी पुरंदरे यांनी व्यक्त केले.

लातूर : ‘‘भाषा हे जीवनाचे मूलभूत अंग आणि अभिव्यक्तीचे प्रभावी साधन आहे. भाषेवर जितके प्रेम अधिक असेल तितकी ती बहरते. तिची काळजी घ्यायला हवी. भाषेबद्दल आपल्याला भयंकर अभिमान असतो’’, कोणी आपल्या भाषेबद्दल बोललं तर आपण लगेच फणा काढतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला लगेच आठवते. परंतु, भाषेबद्दल आपल्याला खरोखर अभिमान असतो का? की आपल्याला भाषेचा पुळका आलेला असतो ही बाब आत्मचिंतन करण्यासारखी आहे’’, असे मत लेखिका माधुरी पुरंदरे यांनी व्यक्त केले.

सतत होणारे अपघात पाहवत नसल्याने अखेर पोलिसांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

येथील ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाच्या वतीने ‘लिहावे नेटके’ याविषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. ज्ञानप्रकाशने पालकांसाठी ‘भाषासमृद्धी मधून व्यक्तिमत्त्व विकसन’ हा कार्यशाळेचा उद्देश होता. ऑनलाइन झालेल्या या कार्यशाळेत २६० पेक्षा अधिक पालक सहभागी झाले होते. ‘‘मूल शाळेत येण्यापूर्वीच त्याने भाषा अवगत केलेली असते. ती परिसर भाषा असते. त्यालाही व्याकरण असते. पण, ते मांडले गेलेले नाही. कधी हालचालीची, हावभावाची, करुणेची, अभिनयाची, ध्वनीभाषा, बोलीभाषा या विविध अंगाने ती फुललेली असते. भाषा ग्रहणशील आधी असते.

त्यानंतर ती अभिव्यक्त होते. शाळेत आल्यानंतर घरची भाषा व शाळेतील भाषा यात भाषिक पूल तयार होतो. तसं पाहिलं तर भाषेला प्रमाण व अप्रमाण असा भेदाभेद कधीच नसतो. भाषेवर जितके प्रेम अधिक तितकी ती बहरते. भारतीय भाषेचे संवर्धन व्हायला हवे. तिला लाभलेले नवनवीन कंगोरे समजून घ्यायला हवेत. केवळ अभिमान बाळगणे म्हणजे भाषेवरील प्रेम नव्हे’’, असे त्या म्हणाल्या. कार्यशाळेसाठी ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे संचालक सतीश नरहरे, सविता नरहरे, व्यवस्थापक अशोक गुरदळे यांनी पुढाकार घेतला.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love Mother Tongue, Author Madhuri Purandare Said