परभणीत थंडीचा कहर कायम

कैलास चव्हाण
रविवार, 30 डिसेंबर 2018

परभणी : सलग दुसऱ्या दिवशीही परभणीत थंडीचा कहर कायम राहीला असून गारठ्याने जनजीवन विस्कळीत केले आहे. पारा 3.03 अंश एवढा नोंदवला गेला आहे. परभणीत विक्रमी थंडी पडली आहे.

परभणी : सलग दुसऱ्या दिवशीही परभणीत थंडीचा कहर कायम राहीला असून गारठ्याने जनजीवन विस्कळीत केले आहे. पारा 3.03 अंश एवढा नोंदवला गेला आहे. परभणीत विक्रमी थंडी पडली आहे.

कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठुन गेलेला आहे. नोंव्हेबर पासून जिल्ह्यात चांगलीच थंडी पडत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पारा 10 अंशाच्या खाली आहे. शनिवारी ( ता.29) 15 वर्षानंतर सर्वात निचांकी तापमानाची नोंद परभणीत झाली आहे. रविवारी देखील थंडीचा प्रभाव कायम राहीला आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे थंडगार वारे जोरात वाहु लागल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. रविवारी पहाटे सहा वाजता शहरा जवळील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागात 3.03 अंश एवढ्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली.

Web Title: Low Temperature in Parbhani Still On