"महाबीज'चे बियाणे यंदा स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

जालना - गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप पेरणीसाठी सर्वच बियाण्यांच्या किमती "महाबीज'ने 20 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

जालना - गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप पेरणीसाठी सर्वच बियाण्यांच्या किमती "महाबीज'ने 20 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेत "महाबीज'ने सोयाबीन, उडीद, मूग आणि तुरीच्या बियाण्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे बियाणाचा दर प्रतिकिलो 67 रुपये होता. यंदा 57 रुपये प्रतिकिलो दराने सोयाबीन मिळणार आहे. उडदाचे बीज 240 रुपयांऐवजी 157 रुपये तर मूगाच्या बियाणे 210 ऐवजी 168 रुपये प्रतिकिलो आहे.

Web Title: mahabeej seed rate cheap