esakal | महादेव जानकर यांनी केले पंकजा मुंडेंचे औक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Mahadev Jankar is with Pankaja Munde while filing nomination for maharashtra vidhansabha 2019

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी परळीतून महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी त्यांचे आई प्रज्ञा मुंडे, बहिण खासदार डॉ. प्रितम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे व मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी औक्षण केले.

महादेव जानकर यांनी केले पंकजा मुंडेंचे औक्षण

sakal_logo
By
प्रविण फुटके

भाजप परळी : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी परळीतून महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी त्यांचे आई प्रज्ञा मुंडे, बहिण खासदार डॉ. प्रितम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे व मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी औक्षण केले. यावेळी पती डॉ. अमित पालवे, गौरव खाडे उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या फेरीत समर्थकांनी दिलेल्या जोरदार घोषणांनी परिसर दणानून गेला. 

Vidhan Sabha 2019 : गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे नतमस्तक; पंकजांविरुद्ध लढाई

दरम्यान, सकाळी घरी औक्षण झाल्यानंतर त्यांनी गणपती मंदिर, वैद्यनाथ मंदिर आणि नंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. नंतर मोठी फेरी निघाली.