कंपनीत रोबोट करतो महादेवाची पूजा

औरंगाबाद - वाळूजच्या कापसे सन्स आणि रोबोटिक्‍स ॲण्ड ऑटोमेशन (केएसआरए) कंपनीत भगवान शंकराच्या प्रतिमेची आरती करताना रोबोट.
औरंगाबाद - वाळूजच्या कापसे सन्स आणि रोबोटिक्‍स ॲण्ड ऑटोमेशन (केएसआरए) कंपनीत भगवान शंकराच्या प्रतिमेची आरती करताना रोबोट.

औरंगाबाद - यांत्रिकीकरणामुळे अवघड कामे सोपी झाली आहेत; पण आता देवाची उपासनाही यंत्राद्वारे केली जाणार आहे. औरंगाबादच्या कापसे सन्स रोबोटिक्‍सने यावरही पर्याय उभा करीत देवाच्या दारातही माणसाचे श्रम कमी केले आहेत. महाशिवरात्रीचे औचित्य साधून वाळूजच्या या कंपनीने भगवान शंकराची आरती करणारी यंत्रणा आपल्या कौशल्यातून तयार केली आहे.

तांत्रिक काम असेल तर माणूस यंत्रांचा वापर करतो; मात्र देवापुढे हात जोडायचे झाले तर तो स्वतः हजर होतो आणि आपल्या परीने आराधना करून देवाकडे मागने मागतो. देवापुढे उभे राहण्याचे हे कामही आता नवीन तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. यासाठी औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहतीत कार्यरत कापसे सन्स रोबोटिक्‍स ॲण्ड ऑटोमेशन या कंपनीने अशी यंत्रणा तयार केली जी, की देवाची आरती करते. ही आरती करण्यासाठी आता माणसाला हातात तबक धरण्याचे कामही या रोबोटने ठेवले नाही. ‘रोबोट काहीही करू शकतो’ या संकल्पनेतून ही कल्पना पुढे आली आणि अवघ्या तीस दिवसांत कच्च्या मालातून जोडणी करून त्याला देवाची आराधना करण्यासाठी हे अफलातून यंत्र उभे करण्यात आले. 

नव्वद तासांचे श्रम 
गेल्या महिनाभरात कार्यालयीन कामकाजाच्या साथीने कंपनीचे संचालक स्वप्नील कापसे, शिवानी पराटकर आणि राघीब हंसनैन यांनी दरदिवशी तीन तास काम करून एकूण नव्वद तास श्रम यासाठी केले आणि हा रोबोट मॅन्युफॅक्‍चरिंग सेल तयार केला. यामध्ये त्यांनी विविध भागांची जोडणी करून बेस युनिट मॅन्युफॅक्‍चरिंग, ॲड ऑफ इफेक्‍ट मॅन्युफॅक्‍चरिंग, माउंटिंग मॅन्युफॅक्‍चरिंग आदी कामे करण्यात आली आणि हा रोबाट साकारला. यंत्रणा तयार केली. त्यासाठी एकूण पन्नास हजारांचा खर्च आल्याचे संचालक स्वप्नील कापसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com