esakal | संत नामदेव महाराज मंदिरात परतवारी एकादशी निमित्ताने महापूजा
sakal

बोलून बातमी शोधा

संत नामदेव महाराज मंदिरात परतवारी एकादशी निमित्ताने महापूजा

दरम्यान, दरवर्षी आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या एकादशीला येथे मोठी यात्रा भरते.

संत नामदेव महाराज मंदिरात परतवारी एकादशी निमित्ताने महापूजा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली: तालुक्यातील नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराज मंदिरात परतवारी एकादशी निमित्ताने आज बुधवारी (ता. चार) सकाळी सहा वाजता संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार मधुकर खंडागळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. यावेळी सुभाष हुले, ओमप्रकाश हेडा, डॉ. रमेश शिंदे. भिकाजी कदम, शहुराव देशमुख, रमेश महाराज मगर, शिवाजी कऱ्हाळे, डॉ. सवनेकर उपस्थित होते.

हेही वाचा: HSC Result : हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल शंभर टक्के

दरम्यान, दरवर्षी आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. मराठवाड्यासह विदर्भातील भाविक मोठ्या संख्येने नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी येतात. या एकादशीला परतवारी म्हणून ओळखले जाते. जे भाविक पंढरपूर येथे आषाढी एकादशीला गेले नाहीत ते आवर्जून नर्सी येथे येतात. अनेक भाविक पायी दिंड्या घेऊन देखील येथे येतात. मात्र मागच्या वर्षी पासून कोरोना संकटाने सर्वच मंदिर बंद आहेत. यात्रा महोत्सवावर देखील बंदी आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी परतवारी यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे.

हेही वाचा: राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

त्या संदर्भात दोन दिवसापूर्वी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी बुधवारी सकाळी सहा वाजता परतवारी एकादशी निमित्ताने कोरोनाचे नियम पाळत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सकाळी सहा वाजता महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. मंदिर परिसरात नर्सी पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक सुनील गिरी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सकाळी काही भाविक येथे दर्शनासाठी आले होते. मात्र मंदिर बंद असल्याने दुरुनच कळस दर्शन घेऊन हे भाविक आल्या पावली परत गेले.

loading image
go to top