esakal | Ashadi Ekadashi : नर्सीत संत नामदेव महाराज मंदिरात महापूजा
sakal

बोलून बातमी शोधा

नर्सी नामदेव (जि.हिंगोली) : संत नामदेव महाराज मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त  महापुजा झाली.

Ashadi Ekadashi : नर्सीत संत नामदेव महाराज मंदिरात महापूजा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव (Narsi Namdev) येथील संत नामदेव महाराज मंदिरात आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवारी (ता.२०) सकाळी ७.४५ वाजता महापुजा झाली. त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. भाविकांसाठी मंदिर बंदच आहे. हिंगोली (Hingoli) तालुक्यातील नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराज मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील तसेच विदर्भातील भाविक दर्शनासाठी येतात. अनेक गावातून पायी दिंड्या देखील येतात. येथे फडकऱ्यासह भाविकांची मांदियाळी असते. संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत लांबच लांब रांगा असतात. ज्या भाविकांना आषाढी (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपूर येथे जाता आले नाही. ते भाविक भक्त नर्सी नामदेव येथे हमखास नामदेवांच्या दर्शनासाठी येतात. मात्र मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंदच आहे. या वर्षी देखील आषाढी एकादशीला कोरोना (Corona) संकटामुळे मंदिर बंदच असुन जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश आहेत.(mahapuja performed in Saint namdev maharaj mandir at hingoli glp88)

हेही वाचा: Ashadi Ekadashi: प्रवेशद्वारातूनच नाथांचे भाविकांनी घेतले दर्शन

दरम्यान मंगळवारी सकाळी ७.५५ वाजता कोरोनाचे नियम पाळत मोजक्याच जणांच्या उपस्थितीत संत नामदेव महाराज मंदिरात महापुजा करण्यात आली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार संदिप राजपुरे, सुनिल पाटील गोरेगावकर, माजी शिक्षण सभापती संजय देशमुख, नर्सी नामदेव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री.गिरी, पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे, श्री. पारिसकर, शिवाजी मुटकुळे, नारायण खेडकर, संतोष टेकाळे, भिक्काजी महाराज कीर्तनकार, कवी शिवाजी कऱ्हाळे, रामेश्वर मांडगे, सचिन शिंदे, लांबाडे महाराज, शशिकांत गवते, वामण मुळे, अर्जुन गिरी, उद्धव पंडित, श्री.वडणकर यांची उपस्थिती होती.

loading image