Maratha Kranti Morcha औरंगाबाद बाजार समितीवर मराठा आंदोलनाचा परिणाम

प्रकाश बनकर
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या 9 ऑगस्टच्या बंद चा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मंडई वरही दिसून आला. भाजी मंडित नियमित येणाऱ्या मालापेक्षा केवळ दहा टक्केच भाजीपालाची आवक झाली .केवळ तुरळक  भाजीपालाच विक्रीसाठी आला होता.

उत्तर प्रदेशातून बाजार समिती नियमित 80 टन अधिक बटाटा विक्रीसाठी येतो. बंद आंदोलनामुळे हा माल आलाच नाही. यासह राज्यभरातून येणारे विविध भाजीपाल्याच्या गाड्याही बंद आंदोलनामुळे आल्या नाही.

सकाळी साडेआठ वाजता मंडीतील सर्व दुकाने बंद करण्यात आली. अनेक अडत व्यापार्‍यांनी दुकाने न  उघडण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शवला पाठिंबा दर्शवला.

नियमित भरणारी भाजी मंडई गुरुवारी तुरळकच भाजीपाल्यावर यांनी दुकाने मांडली होती तीही सकाळी नऊ नंतर बंद करण्यात आली. सकाळी नऊ नंतर आलेल्या अनेक भाजीपाल्याच्या गाड्या परत गेल्या असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

Web Title: #Maharashtra Bandh aurangabad market bandh