Maratha Kranti Morcha जालन्यात चक्काजाम; जालना शहर बंद

उमेश वाघमारे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जालना- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता.9) जालना जिल्ह्यात ठीक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद पाळण्यात आला आहे.

जालना शहरात येणाऱ्या सर्व चौकात चक्काजाम  आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अंबड चौफुली, इंदेवाडी, भोकरदन तालुक्यातील तळेगाव, बबदनापुर तालुक्यातील चिखली येथे रोडवर टायर जाळ्यात आले. जालना शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली, नव्हा चौक, राजुर चौफुली, कन्हैयानगर, गोलपांगरी, यासह भोकरदन, परतुर, अंबड, घनसवांगी, बदनापुर, जाफराबाद, मंठा तालुक्यात ठीक ठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आले.

बस सेवा बंद
मराठा आरक्षणाच्या चक्काजाम अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून बस सेवा थांबविण्यात आल्याचे चित्र आहे. सकाळपासून एक ही बस रस्त्यावर धावली नाही.

शाळा, महाविद्यालय बंद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: #Maharashtra Bandh jalna bandh