

Kisan Sabha Demands Immediate Drought Relief for Farmers
Sakal
परभणी : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करूनही प्रत्यक्ष आर्थिक मदतीबाबत शासन निर्णयात ठोस तरतूद नसल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. २५ सप्टेंबरच्या शासन निर्णयात केवळ पंचनामे व मदतीबाबत पुढील स्वतंत्र निर्णयाचा उल्लेख असून, पीक नुकसानभरपाईचे दरही अद्याप स्पष्ट नसल्याचे किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी म्हटले आहे.