

Drought Meeting With Cashew Almond Snacks Sparks Discussion
Esakal
राज्यात शेतकरी दुष्काळाच्या झळा सहन करत आहे. पिके करपल्यानं त्यावर रोटर फिरवत आहेत. शेतकऱ्यांसमोर संकट आ वासून उभा असताना मंत्री, नेते एसीत बसून दुष्काळावर बैठक घेत आहेत आणि सुका मेवा खात असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठक होत आहे. या बैठकीत खासदार बंडू जाधव काजू-बदाम खाताना दिसल्यानं चर्चा रंगली आहे.